Umran Malik : अरे, किती लांब उडाले बेल्स, उमरानने 150 KMPH स्पीडने टाकलेला घातक चेंडू, VIDEO

Umran Malik : उमरान मलिक बॉलिंगला येतो, तेव्हा वेगळीत उत्सुक्ता असते. वेग ही उमरान मलिकच्या गोलंदाजीची खासियत आहे. उमरान मलिक सातत्याने 150 KMPH वेगाने गोलंदाजी करु शकतो.

Umran Malik : अरे, किती लांब उडाले बेल्स, उमरानने 150 KMPH स्पीडने टाकलेला घातक चेंडू, VIDEO
Umran malik to Michael Bracewell
Image Credit source: Screengrab
| Updated on: Feb 02, 2023 | 1:53 PM

IND vs NZ 3r T20 : मागच्या दशकभरात टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी टीमवर धाक निर्माण केलाय. टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ मजबूत झाली. तीन वेगवान गोलंदाज मॅच खेळताना, दोन त्याच ताकदीचे गोलंदाज बेंचवर बसून असतात. टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी आता बळकट झाली आहे. या सगळ्या बॉलर्समध्ये उमरान मलिक बॉलिंगला येतो, तेव्हा वेगळीत उत्सुक्ता असते. वेग ही उमरान मलिकच्या गोलंदाजीची खासियत आहे. उमरान मलिक सातत्याने 150 KMPH वेगाने गोलंदाजी करु शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या वेगात बॉलिंग करणारा दुसरा गोलंदाज आज टीम इंडियाकडे नाहीय.

वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड उमरानच्या नावावर

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध तिसरा निर्णायक टी 20 सामना खेळला गेला. या मॅचमध्ये उमरान मलिकने आपल्या बॉलिंगची दाहकता दाखवून दिली. भारतीय बॉलर्समध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड उमरान मलिकच्या नावावर आहे.


ब्रेसवेलची विकेट काढली

कालच्या सामन्यात उमरानने न्यूझीलंडचा ऑलराऊंडर मायकल ब्रेसवेलची विकेट काढली. पाचव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने ब्रेसवेलला बोल्ड केलं. यावेळी स्टम्पसवरच्या बेल्स लांबलचक उडाल्या.

148.6 KMPH वेगाने वाइड यॉर्कर

उमरानने त्याआधी ब्रेसवेलला 148.6 KMPH वेगाने वाइड यॉर्कर टाकला. ब्रेसवेलला तो चेंडू खेळता आला नाही. त्यानंतरच्या चेंडूवर ब्रेसवेलने बाहेर येऊन फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तो असफल ठरला. चेंडूने थेट स्टम्पसवरच्या बेल्स उडवल्या होत्या. बेल्स इतक्या लांबलचक उडाल्या की,  30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊन पडल्या.