AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Umran Malik 160 KMPH वेगाने टाकला चेंडू, 808 रन्स करणाराही हडबडला

Umran Malik: मुंबईत श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 मॅचमध्ये उमरानने 155KMPH वेगाने चेंडू टाकला होता.

Umran Malik 160 KMPH वेगाने टाकला चेंडू, 808 रन्स करणाराही हडबडला
umran-MalikImage Credit source: PTI
| Updated on: Jan 05, 2023 | 2:55 PM
Share

पुणे: सध्या भारतीय क्रिकेटमध्ये उमरान मलिकच्या नावाची चर्चा आहे. मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेल्या उमरान मलिकने आज क्रिकेटप्रेमींच मन जिंकलय. टीम इंडियात तो आपल स्थान पक्क करताना दिसतोय. या सगळ्यामागे आहे, त्याच्या बॉलिंगमधील प्रचंड वेग. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध पहिला टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये उमरान मलिकने 155 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू टाकला. या बॉलमुळे उमरान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज बनलाय. हा रेकॉर्ड झाल्यानंतर उमरान मलिक पुन्हा चर्चेत आहे. 160 किलोमीटर प्रतितास या वेगामुळे. उमरान मलिकची चर्चा सुरु आहे.

उमरानचा मित्र विवरांत शर्मा म्हणाला….

जम्मू-काश्मीरचा फलंदाज विवरांत शर्माने उमरान मलिकच्या वेगाबद्दल माहिती दिलीय. विवरांत उमरान मलिकचा चांगला मित्र आहे. नेट्समध्ये काहीवेळा उमरान 160KMPH वेगात चेंडू टाकतो. उमरानचा तो चेंडू खेळल्यानंतर 135 KMPH वेगाने गोलंदाजी सहज खेळू शकतो. 135 KMPH वेगाची कुठलीही भीती वाटत नाही.

….तर देवच तुम्हाला वाचवेल

विवरांत शर्माने फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि टी 20 मध्ये मिळून 808 धावा केल्या आहेत. “नेटमध्ये नो बॉलचा कुठलाही नियम नसतो. त्यामुळे 22 यार्ड 18 यार्ड बनून जातं. त्यावेळी तिथे कोणी उमरानच्या गोलंदाजीच कौतुक केलं, तर देवच तुम्हाला वाचवेल” असं विवरांत म्हणाला. उमरान मलिक अजून घातक गोलंदाज कशामुळे बनलाय?

उमरान मलिकने श्रीलंकेविरुद्ध किफायती गोलंदाजी केली. त्याने दोन विकेट काढले. या मॅचमध्ये उमरानने एक चेंडू 155 KMPH वेगाने टाकला. या स्पीडमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमरान भारताचा वेगवान गोलंदाज बनलाय. आता उमरानच लक्ष्य शोएब अख्तरच्या वर्ल्ड रेकॉर्डवर आहे. नेट्समध्ये उमरान काहीवेळा 160 KMPH वेगाने गोलंदाजी करतो. उमरान अशाच वेगात गोलंदाजी करत राहिला, तर लवकरच तो शोएबचा रेकॉर्ड मोडेल. उमरान मलिक आता वेगाबरोबर टप्पा आणि दिशा पकडून गोलंदाजी करतो. त्यामुळे तो अधिक घातक गोलंदाज बनलाय.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ