
आयसीसी टी 20 वर्ल्ड 2024 स्पर्धेतील 25 वा सामना हा ए ग्रुपमधील संघांमध्ये पार पडणार आहे. यजमान यूनायटेड स्टेट्स विरुद्ध टीम इंडिया यांच्यात हा सामना होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मोनांक पटेल याच्याकडे यूएसएची धुरा असणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघ अद्याप अजिंक्य आहेत. टीम इंडिया आणि यूनायटेड स्टेट्स दोन्ही संघ पॉइंट्स टेबलमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत.
दोन्ही संघांना विजयी हॅट्रिकची संधी आहे. तसेच जिंकणारी टीम सुपर 8 साठी क्वालिफाय होईल. तसेच पराभवासह एका संघांची विजयी घोडदौड थांबेल. तसेच एकाप्रकारे हा सामना टीम इंडिया विरुद्ध टीम इंडिया असा असणार आहे. यूएसएच्या संघात 8 भारतीय वंशांचे खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना अनेक अर्थाने महत्त्वाचा असणार आहे. अशात या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना बुधवारी 12 जून रोजी होणार आहे.
यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे.
यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहायला मिळेल.
यूएसए विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहता येईल.
युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.