USA vs PAK Live Streaming: यूएसए सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, पाकिस्तानला धक्का देणार का?

United States vs Pakistan T20 World Cup 2024 Live Match Score: पाकिस्तानचा हा टी 20 वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना आहे. तर यूएसएचा दुसरा सामना असणार आहे. हा सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

USA vs PAK Live Streaming: यूएसए सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, पाकिस्तानला धक्का देणार का?
pak vs usa
Image Credit source: pak vs usa
| Updated on: Jun 06, 2024 | 1:34 AM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 11 व्या सामना ए ग्रुपमधील 2 संघांमध्ये होणार आहे. यजमान यूएसए विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. यूएसएचा हा साखळी फेरीतील दुसरा आणि पाकिस्तानचा पहिला सामना असणार आहे. मोनांक पटेल यूएसएचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानची धुरा आहे. मोनांक पटेल याच्या कॅप्टन्सीत यूएसएने टी 20 वर्ल्ड कपमधील सलामीच्या सामन्यात कॅनडावर विजय मिळवला होता. त्यामुळे यूएसचा आता पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बाबरसेना विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यातबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा?

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना 6 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस येथे होणार आहे.

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरुवात होईल. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर मोफत पाहता येईल.

यूएसए पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज

युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.

पाकिस्तान टीम : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान, शादाब खान, इमाद वसीम, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि अबरार अहमद.