
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात हा ए ग्रुपमधील यजमान यूनायटेड स्टेटस विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. उभयसंघात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. बाबर आझम याच्याकडे पाकिस्तानची कॅप्टन्सी आहे. तर गुजरातच्या मोनांक पटेल यूएसएची धुरा सांभाळत आहे. या सामन्याचं आयोजन हे ग्रँड प्रेरी स्टेडियम,डालास येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला रात्री 9 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. यूएसने टॉस जिंकला. कॅप्टन मोनांक पटेल याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
यजमान यूएसएचा हा दुसरा सामना आहे. यूएसएने या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. शॅडली व्हॅन शाल्कविक याच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये नॉथुश केंजिगे याला संधी देण्यात आली आहे. तर पाकिस्तानचा हा पहिलाच सामना आहे. यूएसएने सलामीच्या सामन्यात कॅनडाच पराभव करत विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे आता पाकिस्तानला पराभूत करत यूएसए सलग दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्नात असणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धतील सलामीचा सामना याच मैदानात झाला होता. त्या सामन्यात दोन्ही संघांनी 190 पार मजल मारली होती. त्यामुळे आता या सामन्यात पाकिस्तान पहिले बॅटिंग करताना यूएसएसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तान आणि यूएसएचे 11 शिलेदार
Here are the playing XIs for USA🇺🇸& PAK🇵🇰
Pakistan aims to kick off their campaign with a win, while the co-hosts USA look to make it two wins in a row 💪🏽
Will USA cause an upset?
👍🏻or👎🏻#USAvPAK | LIVE NOW | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/Y4Dndmm4OC— Star Sports (@StarSportsIndia) June 6, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.