AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी टॉप 10 मधून बाहेर, KKR विरोधात तो विक्रम करणार? एका सामना बदलवू शकतो नशीब

IPL 2026 Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीसाठी आगामी कोलकत्ता नाईट रायडर्सविरोधातील सामना करो वा मरो असा असेल. कारण या सामन्यात तो फ्लॉप ठरला तर मग त्याला ती संधी मिळणे अवघड होईल.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी टॉप 10 मधून बाहेर, KKR विरोधात तो विक्रम करणार? एका सामना बदलवू शकतो नशीब
आयपीएल २०२६, वैभव सूर्यवंशीImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 19, 2026 | 12:53 PM
Share

IPL 2026 Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी गेल्या सामन्यात शुन्यावर बाद झाला. सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज प्रफुल्ल हिंगे याच्या भेदक माऱ्याने त्याचे मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न भंगले. तर आयपीएल 2026 मधील 28 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्सविरोधात ईडन गार्डन्सवर होणार आहे. त्यात वैभवला एक संधी चालून आली आहे. राजस्थान रॉयल्स संघाला पुन्हा विजयाला गवसणी घालता येईल. ईडन गार्डनवर इतिहास रचण्याची मोठा मोका आहे. वैभव कमबॅक करत पुन्हा एकदा नंबर वन होऊ शकतो.

टॉप 10 मधून वैभव बाहेर

IPL 2026 मध्ये सध्या वैभव सूर्यवंशी टॉप 10 मधून बाहेर आहे. आतापर्यंत त्याने 5 सामने खेळेल आहे. त्यात 200 धावांसह त्याची रँकिंग 11वी आहे. पण KKR विरुद्ध कोलकत्ता ईडन गार्डन्सवर त्याने दमदार खेळी खेळल्यास तो पुन्हा नंबर एकला गवसणी घालू शकतो. ऑरेंज कॅपसाठी त्याला IPL 2026 मध्ये अजून मोठ्या धावांची गरज आहे. त्याला इतक्या धावांचा पल्ला गाठावा लागणार आहे.

हे 10 फलंदाज वैभव सूर्यवंशींच्या पुढे

IPL 2026 मध्ये हेनरिक क्लासन याने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याने 6 सामन्यात 283 धावा केल्या आहेत. त्यानंतर शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 4 डावात 251 धावा केल्या आहेत. विराट कोहली या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 247 धावा केल्या आहेत. तर यादीत रजत पाटीदार 22 षटकांरासह 230 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय ईशान किशनने सहा सामन्यात 213 धावा आणि प्रभासिमरन सिंह याने 5 सामन्यात 211 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने 5 सामन्यात 203 धावा केल्या आहेत. त्यानंतर फिल सॉल्ट 202 तर आयुष्य म्हात्रे 201 धावांसह या यादीत आहे.

KKR विरोधातील सामन्यात हव्या 84 धावा

वैभव सूर्यवंशी सध्या या टॉप-10 विरोधात आहे. पण आगामी कोलकत्ता नाईट रायडर्सविरोधात त्याला कमबॅकची संधी आहे. त्यासाठी त्याला या सामन्यात 84 धावांचा डोंगर उभा करावा लागेल. या सामन्यात त्याने जर काही चौकार आणि षटकार लगावले तर तो ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत अव्वल ठरेल. तर या सामन्यात त्याने सर्वाधिक षटकार मारले तर तो रजत पाटीदारला पिछाडीवर टाकेल. वैभवने आयपीएलमध्ये 18 षटकार ठोकले आहे. त्याला रजत पाटीदारची बरोबरी करण्यासाठी अजून चार षटकारांची गरज आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...