Ind vs Nz Final : तेव्हा मी असं करण्याचा निर्णय घेतला… वरुण चक्रवतीने असा कोणता खुलासा केला?

वरुण चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी करत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने स्टम्पच्या आसपास बॉलिंग करून फलंदाजांच्या चुकांचा फायदा घेतला. त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत चांगले समन्वय साधल्याचेही स्पष्ट केले. 252 धावांचं लक्ष्य सहज गाठता येईल असा त्याचा विश्वास आहे.

Ind vs Nz Final : तेव्हा मी असं करण्याचा निर्णय घेतला... वरुण चक्रवतीने असा कोणता खुलासा केला?
Varun Chakravarthy
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2025 | 8:35 PM

varun chakravarthy brilliant bowling : भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना अत्यंत रोमांचक वळणावर आला आहे. टीम इंडियाचे तीन महत्त्वाचे खंदे फलंदाज शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा तंबूत परतले आहेत. विराट तर दहा मिनिटंही क्रिझवर थांबला नाही. त्याला बाद करण्यात आलं. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता अधिकच वाढली गेली आहे. पण या सामन्यात न्यूझीलंडने पहिली फलंदाजी घेतल्यानंतर मोठी रणनीती करण्यात आली होती. वरुण चक्रवर्तीने त्याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) च्या फायनल सामन्यात (Ind vs Nz Final) धमाकेदार सुरुवातीनंतर न्यूझीलंड संघाचा स्कोअर 300 पार जाईल असं वाटत होतं. पण मिस्ट्री बॉलर वरुण चक्रवर्ती आला आणि त्याने न्यूझीलंडच्या स्वप्नांच्या चिंधड्या उडवल्या. न्यूझीलंडची इनिंग 251 वर संपल्यानंतर त्याने आपला प्लान उलगडला, भारताने एका सहज पिचवर न्यूझीलंडला कशा प्रकारे रोखले याचा खुलासा वरूणनने केला आहे. वरुणने मागील सामन्यांप्रमाणे फायनलमध्ये देखील शानदार गोलंदाजी केली आणि दोन विकेट घेतल्या आहेत.

न्यूझीलंडची इनिंग संपल्यानंतर वरुण म्हणाला की, “मागील दोन सामन्यांच्या तुलनेत ही चांगली विकेट होती. या पीचवर बॉल जास्त टर्न होत नव्हता, हे समजून घेतल्यानंतर मी स्टंपच्या आजूबाजूला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. असं करताना बॅटसमनच्या चुका होण्याची वाट पाहत होतो. मला डेथ ओव्हर्स आणि पावरप्लेमध्ये बॉलिंग करायला खूप आवडते. यामुळे मला विकेट्स घेण्याचा उत्तम संधी मिळतो.”

तर धावांचा पाठलाग करू

“मला कुलदीप, जड्डू भाई आणि अक्षर यांच्याशी बोलायला आवडतं. मी क्रिकेटमध्ये नवीन आहे. त्यामुळे मला त्यांच्याशी सलोख्याचे संबंध करायचे आहेत. 252 ही धावसंख्या अत्यंत छोटी आहे. जर आपण सुरुवातीला चांगली बॅटिंग केली, तर हा स्कोअर सहज गाठता येईल,” असं त्याने सांगितलं.

वरुणचा शानदार स्पेल

एकूणच, वरुणने फायनलमध्ये आपलं काम उत्कृष्टपणे केलं. त्याने टीमला आवश्यक वेळी ब्रेक-थ्रू दिला, विल यंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आणि मग धमाकेदार खेळणाऱ्या ग्लेन फिलिप्सची 38व्या ओव्हरमध्ये कीवी टीमला आणखी एक मोठा धक्का दिला. वरुणने 10 ओव्हरांच्या स्पेलमध्ये 45 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे न्यूझीलंडला 252 धावांवर रोखण्यात त्यांचा महत्त्वाचा योगदान होता.