IND vs NZ Final : 3 षटकार आणि 5 चौकार, कॅप्टन रोहित शर्माचं झंझावाती अर्धशतक, टीम इंडियाची वादळी सुरुवात
India vs New Zealand Final Rohit Sharma Fifty : कर्णधार रोहित शर्मा याने झंझावाती अर्धशतकी खेळी करत टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करुन दिली आहे. रोहितने या खेळीत 3 षटकार आणि 5 चौकार लगावले.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत आतापर्यंत त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नव्हती. रोहितने कर्णधार म्हणून 100 टक्के कामगिरी केली. मात्र रोहितला फलंदाज म्हणून मोठी खेळी करण्यात अपयश येत होतं. मात्र रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात ही सर्व उणीव भरुन काढली आहे. रोहितने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना स्फोटक अर्धशतक झळकावलं आहे. रोहितच्या या खेळीमुळे टीम इंडियाला वेगवान आणि अप्रतिम सुरुवात मिळाली आहे. रोहितला दुसऱ्या बाजूने उपकर्णधार शुबमन गिल हा देखील चांगली साथ देत आहे.
न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित आणि शुबमन सलामी जोडी मैदानात आली. कर्णधार रोहितने सुरुवातीपासून फटकेबाजी करायला सुरुवात केली. रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. रोहित अशाप्रकारे अर्धशतकाजवळ येऊन पोहचला. त्यानंतर रोहितने डावातील 11 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. रोहितने यासह अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने या अर्धशतकी खेळीत 41 चेंडूत 121.95 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा केल्या. रोहितच्या या खेळीत 3 सिक्स आणि 5 चौकारांचा समावेश आहे. रोहितने षटकार आणि चौकारांच्या मदतीने 8 चेंडूंमध्ये 38 धावा जोडल्या. तर रोहितने इतर धावा या धावून केल्या. रोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 58 वं अर्धशतक ठरलं.
शुबमनसोबत शतकी भागीदारी
रोहितने अर्धशतकानंतर फटकेबाजी अशीच सुरुच ठेवली. तसेच दुसऱ्या बाजूने शुबमनने सातत्याने एकेरी धाव घेऊन रोहितला स्ट्राईक दिली. रोहितने एका बाजूने फटकेबाजी केली. तर शुबमनने दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. दोघांनी अशाप्रकारे सलामी शतकी भागीदारी केली.
रोहितची फटकेबाजी
Rohit Sharma takes to the skies early on in the powerplay ✈️
Catch the Final Live in India on @StarSportsIndia.
Here are the global broadcast details: https://t.co/S0poKnxpTX#ChampionsTrophy #INDvNZ pic.twitter.com/5yiwmpr9dO
— ICC (@ICC) March 9, 2025
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ
