
टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडू हे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहेत. टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन यासारखे अनेक स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका करत आहेत. विराट कोहली या स्पर्धेत दिल्लीचं प्रतिनिधित्व करत आहेत. विराटने या स्पर्धेतील पहिल्या 2 सामन्यात धमाका केला. विराटने पहिल्या सामन्यात शतक आणि त्यानंतर अर्धशतक झळकावलं. विराटने अशाप्रकारे एकूण 208 धावा केल्या आहेत. मात्र आता मोठी अपडेट समोर आली आहे.
विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान मोठा निर्णय घेतला आहे. विराटने दिल्ली टीमची साथ सोडली आहे. विराट दिल्लीची साथ सोडून घरी परतला आहे. विराट आता या स्पर्धेत दिल्लीकडून उर्वरित 3 सामने खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट बंगळुरु विमानतळावरुन घरासाठी रवाना झाला आहे. विराट कुटुंबियांसह नववर्षांचा जल्लोष करण्यासाठी निघालाय.
विराटने टीमची साथ सोडली असली तरी त्याचं काही दिवसांनी कमबॅक होऊ शकतं. आता विराट या स्पर्धेत दिल्लीच्या पुढील 3 सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र विराट 6 जानेवारीला होणाऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. दिल्ली या सामन्यात रेल्वे विरुद्ध भिडणार आहे. तसेच विराटचा हा न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजआधी देशांतर्गत क्रिकेटमधील अखेरचा सामना असणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवलीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे रेल्वे विरूद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे.
विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2 सामन्यात चाहत्यांना मनं जिंकली. विराट या स्पर्धेत आंध्र प्रदेश आणि गुजरात विरुद्ध खेळला. विराटने या दोन्ही सामन्यांत 104 च्या सरासरीने 208 धावा केल्या. विराटने पहिल्या सामन्यात 131 धावा केल्या. विराटची दुसर्या सामन्यात शतकाची संधी अवघ्या काही धावांनी हुकली.
विराटने सातत्य काय असतंय़? हे त्याच्या फिटनेस, धावा करण्यातून आणि इतर बाबींमध्ये दाखवून दिलं आहे. विराटने गुजरात विरुद्ध 50 पेक्षा अधिक धावा केल्या. विराटची यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही सलग सहावी वेळ ठरली. विराटने या दरम्यान 3 शतकं झळकावली आहेत.