AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : W,W,W, रहाणे, सूर्यकुमार आणि शिवम ढेर, सेमी फायनलमध्ये त्रिकुट फ्लॉप

Ranji Trophy Semi Final Mum vs vid : टीम इंडियासाठी खेळणाऱ्या मुंबईच्या 3 स्टार फलंदाजांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निराशाजनक कामगिरी केली आहे.

Ranji Trophy : W,W,W, रहाणे, सूर्यकुमार आणि शिवम ढेर, सेमी फायनलमध्ये त्रिकुट फ्लॉप
ajinkya rahane suryakumar yadav and shivam dube
| Updated on: Feb 18, 2025 | 7:55 PM
Share

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीत मुंबई विरुद्ध विदर्भ आमनेसामने आहेत. मुंबई विदर्भविरुद्ध अडचणीत सापडली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे तिघे अनुभवी फलंदाज पहिल्या डावात ढेर झाले. विदर्भाने पहिल्या डावात 383 धावा केल्या. मुंबईने या धावांच्या प्रत्युत्तरात एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावले. मुंबईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट्स गमावून 188 धावा केल्या आहेत. मुंबई अजून 195 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाच्या या 3 दिग्गज फलंदाजांनी निर्णायक सामन्यात घोर निराशा केली. विदर्भाच्या पार्थ रेखाडे याने या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

मुंबईची पहिल्या डावात फार निराशाजनक सुरुवात राहिली. युवा सलामीवर आयुष म्हात्रे 18 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आकाश आनंद आणि सिद्धेश लाड या दोघांनी मुंबईला 85 धावांपर्यंत पोहचवलं. सिद्धेश लाड 35 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर पार्थ रेखाडे याने मुंबईला दणका देत एकाच ओव्हरमध्ये 3 झटके दिले. विदर्भाने यासह मुंबईला बॅकफुटवर ढकललं

एकाच ओव्हरमध्ये 3 झटके

पार्थ रेखाडे मुंबईच्या डावातील 41 वी ओव्हर टाकायला आला. पार्थने कर्णधार अजिंक्य रहाणे याला क्लिन बोल्ड केलं. रहाणेने 24 धावा केल्या. तर त्यानंतर पार्थने सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांना आऊट केलं. पार्थने या दोघांना भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे मुंबईची स्थिती 5 बाद 113 अशी झाली.

त्यानंतर हर्ष दुबे याने 42 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर मुंबईला सहावा झटका दिला. त्यामुळे मुंबईची 6 बाद 118 अशी स्थिती झाली. शार्दूल ठाकुर याच्या रुपात मुंबईने सातवी आणि दुसऱ्या दिवसातील अखेरची विकेट गमावली. शार्दूलने 37 धावा केल्या. त्याआधी शिवम दुबे याने विदर्भाला 400 पार पोहचण्यापासून रोखलं. शिवमने 49 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. तर विदर्भासाठी ध्रुव शौरे याने 74, दानिशने 79, करुण नायर याने 45 आणि राठोडने 54 धावांचं योगदान दिलं.

विदर्भ प्लेइंग इलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, पार्थ रेखाडे, दानिश मलेवार, करुण नायर, यश राठोड, हर्ष दुबे, दर्शन नळकांडे, यश ठाकूर आणि नचिकेत भुते.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.