
देशांतर्गत वनडे स्पर्धा स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी 24 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. दिल्लीने देखील आपल्या संघातील खेळाडूंची औपचारीक नावं जाहीर केली आहेत. पण अजूनही संघाची घोषणा काही केलेली नाही. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अवघ्या दोन दिवसांचा अवधी असताना संघाची घोषणा न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दिल्ली संघात असं काय सुरू आहे की घोषणा केली जात नाही. कारण दिल्ली संघाला 21 डिसेंबरला स्पर्धेसाठी रवाना होणं भाग आहे. पण अजून संघच ठरला नसल्याने खेळाडूही संभ्रमात आहेत. संघ जाहीर करण्यास इतका उशीर का? डीडीसीएमध्ये तणावाचं वातावरण असल्याने संघाची घोषणा करण्यास उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येक गटाला असं वाटतं की विराट आणि पंतसोबत त्यांचे खेळाडू असले पाहीजेत. त्यामुळे संघाची घोषणा करण्यास उशीर होत आहे.
विजय हजारे ट्रॉफीत विराट कोहली आणि ऋषभ पंत खेळणार हे स्पष्ट झाल्यानंतर डीडीसीएने संभाव्य खेळाडूंची घोषणाक केली. दिल्लीने 26 संभाव्य खेळाडूंच्या नावाची घोषणा केली होती. यात विराट कोहली आणि ऋषभ पंत यांचं नाव होतं. रिपोर्टनुसार, विजय हजारे 2025 स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यापूर्वीच डीडीसीएचे अधिकारी आणि व्यवस्थापक आमनेसामने आले आहेत. विराट आणि पंत सोबत त्यांचे खेळाडू खेळावेत, अशी अधिकाऱ्यांचं मत आहे. या वादामुळे संघाची घोषणा करण्यात उशीर होत आहे.
विराट कोहली आता फक्त वनडे सामने खेळत असल्याने विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. कारण त्याची निवड करायची तर निवड समितीवरही दबाव राहतो. अशा स्थितीत 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणं भाग आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेत 24 डिसेंबरला दिल्लीचा सामना आंध्र प्रदेशशी होणार आहे. 26 डिसेंबरला गुजरात, 29 डिसेंबरला सौराष्ट्र, 31 डिसेंबरला ओडिशा, 3 जानेवारीला सर्विसेज, 6 जानेवारील रेल्वे आणि 8 जानेवारीला हरियाणाशी लढत होईल.