रोहित-विराट यांच्याबाबत सुनिल गावस्कर काय बोलून गेले! टी20 वर्ल्डकप खेळण्याबाबत केलं झोंबणारं वक्तव्य

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मोठी उलथापालथ झाली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धाही जवळ आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला. असं असताना विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत सुनिल गावस्कर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांचं वक्तव्य विराट रोहितच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे.

रोहित-विराट यांच्याबाबत सुनिल गावस्कर काय बोलून गेले! टी20 वर्ल्डकप खेळण्याबाबत केलं झोंबणारं वक्तव्य
रोहित-विराट टी20 वर्ल्डकपमध्ये घ्यायला हरकत नाही, पण...! सुनिल गावस्कर यांच्या वक्तव्याने खळबळ
| Updated on: Jan 06, 2024 | 3:51 PM

मुंबई : टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहे. 1 जून 2024 पासून वर्ल्डकप स्पर्धा सुरु होईल आणि 29 जूनला अंतिम सामना असणार आहे. तसा विचार केला तर आजपासून 5 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे कर्णधारपद कोणाकडे सोपवायचं इथपासून कोण संघात असेल याबाबतची खलबतं सुरु झाली आहे. रोहित आणि विराट जवळपास दीड वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. या दोघांनी आयपीएल स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच 2024 आयपीएल स्पर्धेतही खेळताना दिसणार आहेत. या दोघांची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे त्यांना टी20 वर्ल्डकप स्पर्धेत घ्यायला हवं असा एक मतप्रवाह आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 वर्ल्डकपमध्ये खेळू असं बीसीसीआयला कळवलं आहे. त्यामुळे त्यांची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत निवड झाली तर आश्चर्य वाटायला नको. आता त्याबाबत माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी मत व्यक्त केलं आहे.

“टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची खेळणं गरजेचं आहे. फलंदाजी व्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंकडून साधारण क्षेत्ररक्षणाची अपेक्षा आहे. कारण जेव्हा वय 35-36 होतं होतं तेव्हा स्लो होतो. आपल्या हातून तितका वेगाने थ्रो होत नाही. त्यामुळे त्यांना क्षेत्ररक्षणात कुठे ठेवावं ही चर्चा व्हायला हवी. दोघांच्या क्षेत्ररक्षणात तसा काही त्रास नाही. ते आजही चांगले खेळाडू आहेत. रोहित शर्मा कर्णधार असेल की नाही ते माहिती नाही. पण वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याचं योगदान महत्त्वाचं असेल. जो पण कर्णधार असेल त्याला नक्कीच फायदा होईल.”, असं सुनिल गावस्कर यांनी सांगितलं.

“विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर शंका घेण्याचं कारण नाही. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे.” असंही सुनिल गावस्कर यांनी सांगितलं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत निवड झाली तर तिकीट पक्कं असं समजायला हरकत नाही. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर त्यांच्या निवडीची शक्यता अधिक वाढेल. टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे.