Thank You..! चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यापूर्वी विराट-रोहितने मानले चाहत्यांचे आभार, इमोशनल Video

चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांनी जेतेपदासाठी कंबर कसली आहे. या सामन्यापूर्वी रनमशिन्स विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा इमोशनल व्हिडीओ समोर आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट आणि रोहितचा हा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे.

Thank You..! चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यापूर्वी विराट-रोहितने मानले चाहत्यांचे आभार, इमोशनल Video
रोहित शर्मा आणि विराट कोहली
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 08, 2025 | 3:26 PM

भारतीय क्रिकेट इतिहासात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं नाव घेतलं जाईल. मागच्या दशकात या दोन्ही क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटचं नाव उंचवण्यात मोठा हातभार लावला आहे. दोन्ही क्रिकेटपटूंना चॅम्पियन्स ट्रॉफीत बोलबाला आहे. विराट कोहली भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. टी20 वर्ल्डकपनंतर आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या वेशीवर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना 9 मार्चला होणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. इतकंच काय तर दोघांनी अंतिम फेरीत चांगली कामगिरी करू असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही खेळाडूंच्या वनडे कारकिर्दितील शेवटचा सामना असेल अशी चर्चा रंगली आहे.

विराट कोहलीने सांगितलं की, ‘आम्ही फॅन्सचं समर्थन आणि प्रेमाला महत्त्व देतो. त्यांची कदर करतो. तुम्ही नेहमीच आमच्या संघाच्या मागे उभे राहता. तुमच्या पाठिंब्याबाब मी नेहमीच आभारी आहे. आम्ही नेहमीच तुमच्याशी वचनबद्ध राहू. तसेच भारताचा ध्वज उंच फडकवण्यासाठी मैदानात जे काही शक्य आहे ते देऊ. आम्ही तुम्हाला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करू.’ दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा यानेही आपलं मन मोकळं केलं आहे. ‘सर्व चाहत्यांचे पाठिंब्यासाठी आभार. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आम्हाला असाच पाठिंबा देत राहिलात तर खूपच आनंद होईल. मला खात्री आहे की, आम्ही तुम्हाला निराश करणार नाही. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.’, असं रोहित शर्मा म्हणाला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वनडे कारकिर्दितील हा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा 38 वर्षांचा होणार आहेत, तर विराट कोहली हा 36 वर्षांचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 मध्ये हे दोन्ही खेळाडू खेळणं अशक्य आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा हा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहते या दोघांना विजयी निरोप मिळावा ही इच्छा व्यक्त करत आहेत.