Virat Kohli: विराटने स्लीपमध्ये घेतली सुपर्ब कॅच, सुनील गावस्करांनीही केला सलाम, पाहा VIDEO

दोन वर्षात भले विराट कोहलीला (Virat Kohli) शतक झळकवता आले नसेल, पण आज केपटाऊन टेस्टच्या (Cape Town Test) दुसऱ्यादिवशी विराटने एक खास सेंचुरी पूर्ण केली.

Virat Kohli: विराटने स्लीपमध्ये घेतली सुपर्ब कॅच, सुनील गावस्करांनीही केला सलाम, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 10:11 PM

केपटाऊन: मागच्या दोन वर्षात भले विराट कोहलीला (Virat Kohli) शतक झळकवता आले नसेल, पण आज केपटाऊन टेस्टच्या (Cape Town Test) दुसऱ्यादिवशी विराटने एक खास सेंचुरी पूर्ण केली. विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 100 झेल पूर्ण (Virat Kohli 100 catch) केले आहेत. या सामन्याआधी विराटच्या खात्यावर 98 झेल होते. दक्षिण आफ्रिकेच्या डावात विराटने टेंबा बावुमा आणि रेसी वॅन डर डुसेचा झेल घेऊन कॅचचे शतक पूर्ण केले. हा टप्पा गाठणार विराट कोहली सहावा भारतीय खेळाडू बनला आहे.

कोणी किती झेल घेतले? भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 209 झेल टीम इंडियाचे विद्यमान हेड कोच राहुल द्रविडने घेतले आहेत. त्यानंतर व्हीव्ही एस लक्ष्मण, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी 100 पेक्षा जास्त झेल घेतले आहेत. राहुल द्रविडने 163 कसोटी सामन्यात 209 झेल घेतले आहेत. लक्ष्मणने 134 टेस्टमध्ये 135 झेल घेतले आहेत. सचिनने 200  कसोटी सामन्यात 115 झेल घेतले आहेत. सुनील गावस्करने 125 कसोटी सामन्यात 108 झेल घेतले, तेच अझरुद्दीनने 99 कसोटीत 105 झेल घेतले आहेत. विराटने 99 कसोटीमध्ये हा टप्पा गाठला आहे.

विराटची शानदार कॅच विराट कोहलीने आपला 100 वा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये पकडला. विराटचा हा झेल पाहून सर्वचजण हैराण झाले. सुनील गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना विराटचे कौतुक केले. चेंडूने बावुमच्या बॅटची कड घेतली व स्लीपमध्ये गेला. त्यावेळी जमिनीच्या दिशेने चेंडूला विराटने शानदार झेलमध्ये बदलले. त्याआधी बावुमाचा सोपा झेल चेतेश्वर पुजाराने सोडला होता. विराटच्या या झेलने बावुमा-पीटरसनची 42 धावांची भागीदारी तोडली. ही जोडी तुटल्यानंतर भारताला झटपट दोन विकेट मिळाल्या.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.