GT vs RCB, IPL 2022: किंग कोहली इज बॅक, विराटची क्लासिक हाफ सेंच्युरी, पहा VIDEO

| Updated on: Apr 30, 2022 | 4:59 PM

GT vs RCB, IPL 2022: विराटने आज परफेक्ट क्रिकेटिंग फटके दाखवले. आज विराटची फलंदाजी पाहून जुन्या कोहलीची झलक दिसली. हे फिफ्टी त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

GT vs RCB, IPL 2022: किंग कोहली इज बॅक, विराटची क्लासिक हाफ सेंच्युरी, पहा VIDEO
Virat kohli
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: मागच्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशाचा सामना करणाऱ्या विराट कोहलीने (Virat kohli) आज अखेर आपल्या बॅटने उत्तर दिलं. बऱ्याच महिन्यांपासून शांत असलेली विराटची बॅट आज तळपली. विराटच्या फॉर्मबद्दल सातत्याने शंका उपस्थित केली जात होती. आयपीएल (IPL) सुरु झाल्यापासून, तर विराटच्या बॅटमधून धावा जणू आटल्या होत्या. विराट फॉर्मसाठी चाचपडत होता. विराटचा फॉर्म टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. कारण आगामी टी 20 वर्ल्ड कप लक्षात घेता, विराटने फॉर्ममध्ये परतणं आवश्यक होतं. अखेर आज मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात विराटची बॅट तळपली. त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याने 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यात सहा चौकार आणि एक षटकार आहे.

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल

विराटने आज पहिल्या ओव्हरपासून गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मोहम्मद शमीच्या पहिल्या ओव्हरमध्येच त्याने दोन चौकार लगावले. विराटने आज परफेक्ट क्रिकेटिंग फटके दाखवले. आज विराटची फलंदाजी पाहून जुन्या कोहलीची झलक दिसली. हे फिफ्टी त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर केलेला हल्लाबोल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

विराटच्या फॉर्ममध्ये निवड समितीच बारीक लक्ष आहे. विराटचा असाच फॉर्म कायम राहिला, तर त्याला भारताच्या टी-20 संघातूनही डच्चू मिळू शकतो. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे आजचे फिफ्टी आवश्यक होते. आयपीएलमध्ये मागच्या 14 सामन्यांपासून विराटने अर्धशतक झळकावलं नव्हतं. आयपीएलच्या यंदाच्या 15 व्या सीजनमध्ये अर्धशतकाआधी विराटचा सर्वाधिक स्कोर 48 धावा होता. RCB च्या 10 व्या मॅचमध्ये विराटने हे अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या पीचवर विराटचं हे 43 व अर्धशतक आहे. आयपीएलमध्ये विराटच्या नावावर पाच शतक सुद्धा आहेत.

आज विराटने आधीच वेगळ काहीतरी करण्याचे दिले होते संकेत

आज विराट सलामीला आला. स्वत: खराब फॉर्ममध्ये असूनही त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध स्ट्राइक घेतला. आज पहिल्या चेंडूपासूनच त्याने काहीतरी वेगळं करणार असल्याचे संकेत दिले. आज विराट बॅटिंग करताना चेंडू मिडल करत होता. त्याने गुजरात टायटन्सच्या प्रत्येक गोलंदाजाचा सहजतेने सामना केला. फाफ डू प्लेसिसच्या रुपाने आरसीबीची पहिली विकेट लवकर गेली. पण विराटने रजत पाटीदार सोबत मिळून डावाला आकार दिला. रजत पाटीदारनेही अर्धशतक झळकावलं. त्याने 32 चेंडूत 52 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 99 धावांची भागीदारी केली.