Video : विराट कोहली याने नसीम शाह याच्या चेंडूवर मारला तसाच षटकार, हारिस रऊफची आली आठवण

India Vs Pakistan : विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली. शतकी खेळीत विराटने नसीम शाह याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकला. या षटकारामुळे हारिस रऊफची आठवण आली.

Video : विराट कोहली याने नसीम शाह याच्या चेंडूवर मारला तसाच षटकार, हारिस रऊफची आली आठवण
Video : विराट कोहली याचा तसाच काहीसा अंदाज, नसीम शाह याला षटकार ठोकत Action Replay
| Updated on: Sep 11, 2023 | 8:54 PM

मुंबई : आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्या कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी द्विशतकी भागीदारी करत वैयक्तिक शतकं ठोकली. विराट कोहली याने आपल्या शतकी खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या तीन पैकी एक षटकार असा मारला की फँस आणि क्रिकेट एक्सपर्ट आवा्क झाले. विराट कोहली याने नसीम शाह याच्या गोलंदाजी उत्तुंग षटकार ठोकला. यावळी टी 20 वर्ल्डकपमध्ये हारिस रऊफ याला मारलेल्या षटकाराची आठवण झाली. त्या षटकाराची पुनरावृत्ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

विराट कोहली याने 47 व्या षटकात तसाच षटकार ठोकला. नसीम शाह याने हलका शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला. विराट कोहलीने मग तोच कित्ता गिरवत लाँग ऑनवरून षटकार ठोकला. विराट कोहली याच्या सिक्सचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विराट कोहली याचं प्रेमदासा स्टेडियमधलं हे सलग चौथं शतक आहे. विराट विदेशी मैदानावर वनडे सामन्यात चार शतक ठोकणारा पहिला फलंदाज आहे.

विराट कोहली याने शतकी खेळीसह अनेक विक्रमांची नोंद केली. पहिलं तर केएल राहुल सोबत 233 धावांची भागीदारी केली. आशिया कप इतिहासातील भारतीय जोडीची सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याचबरोबर वनडे इतिहासात 13 हजार धावा पूर्ण केल्या. त्याने कमी सामन्यात हे लक्ष्य गाठत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडीत काढला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.