एक गिफ्ट द्या..! विराट कोहलीच्या ब्रँडच्या बुटांची जबरदस्त क्रेझ! 24 तासात दीड लाख जोडींची विक्री
विराट कोहलीच्या One8 या बुटांच्या ब्रँडची सध्या क्रेझ आहे. नुकतंच त्याच्या ब्रँडचं ग्लोबल प्रीमियर झालं होतं. त्यानंतर 24 तासातच दीड लाख बूट विकले गेल. या बुटांची किंमत कोहलीच्या कसोटी सामन्यांच्या धावांच्या बरोबरीने ठेवली आहे.

विराट कोहली क्रिकेट मैदान गाजवतो आणि क्रिकेटप्रेमी त्याच्या खेळीचे चाहते आहे. असं असताना मैदानाबाहेरही विराट कोहलीची क्रेझ पाहायला मिळते. यात आता त्याच्या बुटांचा ब्रँड असलेल्या One8 ची क्रेझ आहे. काही तासांपूर्वी लाँच केलेल्या ब्रँडच्या बुटांची विक्रमी विक्री झाली आहे. रिपोर्टनुसार, 24 तासात या ब्रँडच्या जवळपास दीड लाख बुटांची विक्री झाली आहे. या बुटांची इतकी क्रेझ आहे की, दिल्ली आणि मोठ्या शहरांच्या बाहेर बूट खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. सोशल मीडियावरही या बुटांची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक जण बूट खरेदीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत. तसेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरलही झाले आहेत. अनेक जण वन8 ब्रँडचे बूट मिळाल्याने आनंद व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर या ब्रँडची स्तुती केली जात आहे.
विराट कोहलीचा ब्रँड असलेल्या वन8 बुटांच्या जोडीची किंमत 9230 रुपये आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये इतक्या धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची किंमत तशी ठेवण्यात आली आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या धावांमध्ये आणखी वाढ होणार नाही. पण भविष्यात बुटांची किंमत इतकीच राहिल का? हे सांगणं कठीण आहे. दरम्यान, विराट कोहली पूमा ब्रँडचा चेहरा होता तेव्हा क्रीडापटूंसाठी पूर्ण रेंज लाँच केली होती. त्यात बुटांपासून कपड्यांपर्यंत सर्व क्रीडा क्षेत्राशी निगडीत वस्तू होत्या. तेव्हा कंपनीच्या भागीदारीतून हा ब्रँड तयार केला होता. पण विराट कोहलीने आता आपल्या ब्रँडसह प्रोडक्ट लाँच केलं आहे. दरम्यान, विराट कोहलीचा ब्रँड लाँच करण्यासाठी पूमाने 300 कोटींची ऑफर दिली होती. पण विराट कोहलीने वेगळी वाट निवडली.
A lap around one8 World!
Plenty of curious looks. Plenty of first reactions. And a pair of shoes that had everyone stopping by. pic.twitter.com/ubfAS2DhlT
— one8 (@one8world) June 21, 2026
मिडिया रिपोर्टनुसार, पूमा इंडियाचे माजी एमडीच्या कंपनीसोबत विराट कोहीलने ब्रँड वन8 प्रोडक्ट लाँच केलं आहे. विराट कोहली स्वत: या ब्रँडचा चेहरा आहे. त्यामुळे वन8 प्रोडक्टला प्रसिद्धी मिळण्यास जास्त वेळ लागला नाही. 24 तासात या ब्रँडच्या बुटांची विक्रमी विक्री झाली. विराटच्या प्रोडक्टने 140 कोटींची कमाई केली आहे.