‘चिकू उद्याच्या सामन्यात तू ….’, बसं एवढच, आणि विराट कोहली रडायला लागला

| Updated on: Jun 09, 2022 | 1:27 PM

टीम इंडियाचा अव्वल फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) स्वत: मोठा प्रँकस्टर (Prankster) आहे. म्हणजे त्याला दुसऱ्यांची खोडी काढायला, खेचायला आवडतं.

चिकू उद्याच्या सामन्यात तू ...., बसं एवढच, आणि विराट कोहली रडायला लागला
विराट कोहली
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई: टीम इंडियाचा अव्वल फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) स्वत: मोठा प्रँकस्टर (Prankster) आहे. म्हणजे त्याला दुसऱ्यांची खोडी काढायला, खेचायला आवडतं. अशी मस्ती करुन तो ड्रेसिंग रुममधील वातावरण खेळकर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण हाच विराट किशोरवयात असताना, टीमच्या कोचने एकदा त्याची, अशी फिरकी घेतली होती की, तो कधीच विसरणार नाही. विराट अक्षरक्ष: रडवेला झाला होता. विराट त्यावेळी अंडर 17 (Under-17) मध्ये दिल्लीकडून खेळत होता. दोन-तीन सामन्यात त्याला धावा करता आल्या नव्हत्या. त्याने संपूर्ण सीजनमध्ये दमदार फलंदाजी केली होती. पण काही सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या. त्यामुळे टीमच्या कोचला आणि अन्य सहकाऱ्यांना त्याची फिरकी घेण्याची संधी मिळाली होती. पण विराटला या मस्करीचं इतकं वाईट वाटेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती.

तरुणवयात विराट सोबत प्रदीप सांगवानही दिल्लीच्या संघातून खेळायचा. न्यूज 24 शी बोलताना त्याने हा किस्सा सांगितला. खरंतर त्या सर्वांनी मिळून विराटची मस्करी केली होती. पण विराटच्या मनाला ती गोष्ट इतकी लागली की, तो, रडायला लागला. ती संपूर्ण रात्र तो झोपला नव्हता.

त्याच्याकडून फारशा धावा झाल्या नव्हत्या

आम्ही पंजाबमध्ये अंडर-17 चे सामने खेळत होतो. तिथे दोन-तीन सामन्यात त्याच्याकडून फारशा धावा झाल्या नव्हत्या. त्यावेळी अजित चौधरी नावाचे आमचे कोच होते. ते विराटला ‘चिकू’ म्हणून हाक मारायचे. विराट आमच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. “अजित सर मस्करीमध्ये म्हणाले, त्याला सांग, पुढच्या सामन्यात तो खेळणार नाही. आम्ही सुद्धा सर्व त्या प्लानमध्ये सहभागी होतो” असं सांगवान म्हणाला.

सरांनी विराटच नाव पुकारलं नाही

“टीम मीटिंगमध्ये सरांनी विराटच नाव पुकारलं नाही. त्यानंतर विराट आपल्या खोलीत गेला व रडायला लागला. त्याने सरांना फोन केला व सांगतिलं, मी 200 ते 250 धावा केल्यात. त्या सीजनमध्ये खरोखरच त्याने भरपूर धावा केल्या होत्या. फक्त दोन-तीन मॅचमध्ये त्याच्याकडून धावा झाल्या नव्हत्या. तो इतका भावनिक झाला होता की, त्याने त्याचे बालपणीचे कोच राजकुमार सर यांना फोन केला” असं सांगवान म्हणाला.

सांग सांगवान माझं काय चुकलं

अखेर सांगवानला ‘सर्वांनी मिळून तुझ्यासोबत मस्करी केलीय’ हे विराटला सांगाव लागलं. तुला संघातून वगळलेलं नाही, हे विराटला पटवून दिलं.

“विराट माझ्याकडे आला व मला म्हणाला, सांग सांगवान माझं काय चुकलं. या सीजनमध्ये मी भरपूर धावा केल्या आहेत. मी त्याला म्हटलं, हो हे चुकीचं आहे. मला झोपायचं नाही. संघात माझी निवड झालेली नाही, मग झोपून काय करु? त्यावेळी मी त्याला सांगितलं, तू उद्याचा सामना खेळतोयस, ही सर्व मस्करी होती” असं प्रदीप सांगवान म्हणाला.