Virat Kohli ची सोशल मीडियावर डबल सेंच्युरी, असा मान मिळवणारा पहिलाच क्रिकेटपटू

विराट कोहली (Virat Kohli) भारताचा अव्वल खेळाडू आहे. जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. सध्या विराटचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. मा

Virat Kohli ची सोशल मीडियावर डबल सेंच्युरी, असा मान मिळवणारा पहिलाच क्रिकेटपटू
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 08, 2022 | 11:08 AM

मुंबई: विराट कोहली (Virat Kohli) भारताचा अव्वल खेळाडू आहे. जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. सध्या विराटचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. मात्र सोशल मीडियावर (Social Media) त्याचा जलवा कायम आहे. विराटच्या बॅटमधून धावा आटल्या असल्या, तरी सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या सतत वाढतेय. इन्स्टाग्रामवर (Instagram) विराटच्या फॉलोअर्सची संख्या 200 मिलियन म्हणजे 20 कोटी झाली आहे. इन्स्टग्रामवर इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सची फौज तयार करणारा विराट कोहली पहिला क्रिकेटपटू बनला आहे. यातून विराटची बॅट चालली नाही, तरी त्याचा जलवा कायम असल्याचं दिसून येतं. विराटने आपल्या इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली आहे.

IPL 2022 च्या सीजनमध्ये किती धावा केल्या?

विराट कोहली सध्या विश्रांती घेतोय. आयपीएलचा सीजन संपल्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. गुरुवारपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या सीरीजसाठी विराटला आराम देण्यात आलाय. आयपीएल 2022 मध्ये विराटला काही खास कमाल करता आली नाही. त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतक निघाली. या सीजनमध्ये कोहलीने 16 सामन्यात एकूण 341 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

विराटच्या पुढे दोघे कोण आहेत?

भारतातला कुठलाही खेळाडू फॉलोअर्सच्या बाबतीत विराट समोर टिकू शकत नाही. क्रीडा क्षेत्रात असे काही खेळाडू आहेत, जे विराटपेक्षा पुढे आहेत. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपूट क्रिस्टियानो रोनाल्डोचे 451 मिलियन म्हणजे 45.1 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यानंतर दुसरा नंबर येतो, अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचा. मेसीचे 334 मिलियन म्हणजे 33.4 कोटी फॉलोअर्स आहेत. या दोघांनंतर तिसऱ्या नंबरवर कोहली आहे. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार चौथ्या स्थानावर आहे. त्याचे 175 मिलियन म्हणजे 17.5 कोटी फॉलोअर्स आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें