AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : वर्ल्ड कप सुरू असताना मोठी बातमी, ‘या’ मॅचविनर खेळाडूची सर्जरी!

World Cup 2023 : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक मोठ्या खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर रहावं लागलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दुखापत काहींसाठी मोठं आव्हान ठरला आहे. अशातच वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या मॅच विनर खेळाडूची सर्जरी झाली आहे.

World Cup 2023 : वर्ल्ड कप सुरू असताना मोठी बातमी, 'या' मॅचविनर खेळाडूची सर्जरी!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 11, 2023 | 4:40 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू झाला असून एकावर एक विक्रम रचताना दिसत आहेत. रोमांचक सामने होत असून प्रत्येक संघ सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. वर्ल्ड कपमध्ये अनेक स्टार खेळाडूंच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. भारताचा सलामीवीर शुबमन गिल हा दुखापतीमुळे नाहीतर त्याच्यामागे आजारपण लागलं आहे. अशातच एका स्टार खेळाडूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून याबाबत त्याने पोस्ट करत माहिती दिली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वानिंदू हसरंगा आहे. हसरंगा याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली असून हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर ही सर्जरी करावी लागली. गेल्या अनेक दिवसांपासून तो या दुखापतीमुळे झगडत होता. आशिया कपसह वानिंदू वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेला मुकला आहे.

वानिंदू हसरंगा श्रीलंका संघाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. वर्ल्ड कपमध्ये नक्कीच त्यांना त्याची उणीव भासत असणार आहे. आयपीएलमध्येही हरसंगाने आपली जादू दाखवून दिलीये. ऑल राऊंडर कामगिरीच्या जोरावर संघाला त्याने दबावाच्या परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. आताच झालेल्या लंका प्रीमिअर लीगमध्ये वानिंदू हसरंगा याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब पटकावला होता. लंका प्रीमिअर लीगमध्ये १० सामन्यांमध्ये २७९ धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश त्यासोबतच त्याने १९ विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, श्रीलंका संघाचा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पराभव  झाला होता. श्रीलंका संघाने 300 पेक्षा जास्त धावा करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यामध्ये लंकेच्या गोलंदाजांना पाकिस्तानच्या विकेट घेण्यात अपयश आलं. मोहम्मद रिझवान याच्या नाबाद १३१ धावा आणि अब्दुल्ला शफीक ११३ धावा यांच्या शतकांमुळे श्रीलंकेचा पराभव झाला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?