WCL 2024: पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, विंडिजवर 20 धावांनी विजय

Pakistan Champions vs West Indies Champions 1st Semi Final: पाकिस्तान चॅम्पियनने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लेजेंड्स स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

WCL 2024: पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, विंडिजवर 20 धावांनी विजय
pakistan champion wcl
| Updated on: Jul 12, 2024 | 10:11 PM

वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लेजेंड्स 2024 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन 20 धावांनी विजयी झाली आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिज चॅम्पियनचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. पाकिस्तानने विंडिजला विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र विंडिजला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानने विंडिजला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. विंडिजचं या पराभवासह आव्हान संपुष्टात आलं आहे. तर पाकिस्तानचा आता इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्याती विजयी संघाविरुद्ध अंतिम फेरीत सामना होणार आहे.

विंडिजची 199 धावांचा पाठलाग करताना ठिकठाक सुरुवात झाली. मात्र ड्वेन स्मिथ आणि ख्रिस गेल या सलामी जोडीला आक्रमक सुरुवात करुन देता आली नाही. विंडिजच्या काही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही अखेरपर्यंत टिकून राहून टीमला विजयापर्यंत पोहचवण्यात काही यश आलं नाही. विंडिजसाठी एश्ले नर्स याने सर्वाधिक 46 धावा केल्या. रायड एम्रिटने 29 धावांचं योगदान दिलं. ड्वेन स्मिथने 26 आणि ख्रिस गेलने 22 रन्स केल्या. चॅडविक वॉल्टनने 19 धावा जोडल्या. तर कॅप्टन डॅरेन सॅमी 10 रन्स करुन आऊट झाला. टीनो बेस्ट 5 धावांवर नाबाद राहिला. तर इतरांना काही खास करता आलं नाही. पाकिस्तानकडून सोहाली खान याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर वाहेब रियाझ आणि शोएब मलिक या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या.

त्याआधी विंडिजने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 198 धावा केल्या. पाकिस्तानसाठी कॅप्टन यूनिस खान याने 65 आणि ओपनर कामरान अकमल याने 46 धावा केल्या. तर अखेरीस सोहेल तन्वीर 33 आणि आमीर यामीन 40* धावांची स्फोटक खेळी केली. तर विंडिजकडून फिडस एडवर्ड्स याने 3 विकेट्स घेतल्या. सुलेमान बेनने दोघांना आऊट केलं. तर ड्वेन स्मिथ आणि जर्मन टेलर या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

पाकिस्तान फायनलमध्ये

वेस्ट इंडिज चॅम्पियन्स प्लेइंग इलेव्हन: डॅरेन सॅमी (कॅप्टन), ड्वेन स्मिथ, चॅडविक वॉल्टन (विकेटकीपर), जोनाथन कार्टर, जेसन मोहम्मद, ॲशले नर्स, रायड एम्रिट, जेरोम टेलर, फिडेल एडवर्ड्स, टिनो बेस्ट आणि सुलेमान बेन.

पाकिस्तान चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युनूस खान (कॅप्टन), कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिसबाह-उल-हक, आमेर यामीन, सोहेल खान, वहाब रियाझ आणि सोहेल तन्वीर.