AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NED vs SA : “आम्ही स्पर्धेत उपांत्य फेरी…”, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने स्पष्टच सांगितलं

NED vs SA : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्यांदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. अफगाणिस्तानंतर नेदरलँडने कमाल केली आहे. दिग्गज दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करत खळबळ उडवून दिली आहे.

NED vs SA : आम्ही स्पर्धेत उपांत्य फेरी..., नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने स्पष्टच सांगितलं
NED vs SA : दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर नेदरलँडच्या कर्णधाराने स्पष्ट केली भूमिका, "आम्ही स्पर्धेत यासाठी खेळतो की..."Image Credit source: ANI
| Updated on: Oct 18, 2023 | 12:39 AM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. स्पर्धेतील तीन टप्पे पूर्ण झाले असून कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती आहे. दिग्गज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. तर दक्षिण आफ्रिकेला दुबळ्या नेदरलँडने पराभूत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका सहज जिंकेल असं सांगितलं जात होतं. मात्र झालं भलंतच..हा सामना नेदरलँडने 38 धावांनी जिंकला. नेदरलँडने 43 षटकात 8 गडी गमवून 245 धावा केल्या. तसेच विजयासाठी 245 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ 207 धावांवर सर्वबाद झाला. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेवर 38 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

नेदरलँडने पात्रता फेरीतही दिग्गज वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. तसेच दहा संघात स्थान मिळवत आता मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळे नेदरलँडचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. सर्वच स्तरातून नेदरलँडचं कौतुक होत आहे. असं असताना नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“आमच्या खेळाडूंवर मला अभिमान आहे. आम्ही या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याच्या उद्देशानेच उतरलो आहोत. यासाठी आम्हाला दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघांना पराभूत करावं लागेल. आम्ही आज खूप चांगलं खेळलो. त्यामुळेच विजय सोपा झाला. पुढेही आम्हाला आणखी विजयाची अपेक्षा आहे.”, असं नेदरलँडचा कर्णधा स्कॉट एडवर्ड्स याने सांगितलं. या स्पर्धेत नेदरलँडचा सामना भारताशी सर्वात शेवटी 12 नोव्हेंबरला होणार आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना