ENG vs IND : टीम इंडियाने कॅप्टन बदलला, या खेळाडूकडे 4 सामन्यांसाठी नेतृत्वाची जबाबदारी
England Women vs India Women 2nd T20I Toss and Playing 11 : सांगलीच्या स्मृती मंधाना हीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. स्मृतीने तिच्या नेतृत्वात भारताला विजय मिळवून दिला होता.

मेन्स टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. तर त्याआधी वूमन्स इंग्लंड विरुद्ध वूमन्स इंडिया यांच्यात टी 20i मालिकेतील दुसरा सामना हा आज (1 जुलै) काउंटी ग्राउंड, ब्रिस्टोल येथे खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या सामन्यातही टॉस जिंकला आहे. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंग करण्यासाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही 200 पार मजल मारणार का? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.
तर दुसर्या बाजूला भारतीय संघाने कर्णधार बदलला आहे. भारतीय संघात दुसर्या सामन्यातून नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचं कमबॅक झालं आहे. आता हरमनप्रीतने नेतृत्वाची धुरा आपल्याकडे घेतली आहेत. हरमनप्रीत कौर हीला पहिल्या सामन्याआधी सरावादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे टीम मॅनजमेंटने खबरदारी म्हणून हरमनप्रीतला विश्रांती दिली होती. त्यामुळे हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत उपकर्णधार स्मृती मंधाना हीने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात नेतृत्व केलं होतं. मात्र आता हरमनप्रीत परतली आहे. त्यामुळे हरमनप्रीतचा भारताला दुसर्या सामन्यासह उर्वरित मालिकेत विजयी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
स्मृती मंधानाचा 150 वा टी 20i सामना
इंग्लंड विरुद्धचा दुसरा टी 20i सामना भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीच्या टी 20i कारकीर्दीतील 150 वा सामना ठरला आहे. स्मृती भारताकडून 150 वा टी 20i सामने खेळणाररी दुसरीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. स्मृतीआधी हरमनप्रीत कौर हीने अशी कामगिरी केली आहे.
हरमनप्रीत कौर इज बॅक
🚨 Toss and Team Update 🚨
England win the toss in the 2nd T20I and elect to bowl.
Captain Harmanpreet Kaur is back for #TeamIndia 🙌
Updates ▶️ https://t.co/j4IYcssyRg
#ENGvIND pic.twitter.com/XQO0TOOu1O
— BCCI Women (@BCCIWomen) July 1, 2025
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, रिचा घोष (कर्णधार), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा आणि श्री चरणी.
इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: सोफिया डंकली, डॅनिएल व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कॅप्टन), टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (विकेटकीपर), अॅलिस कॅप्सी, एम आर्लॉट, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, लिन्सी स्मिथ आणि लॉरेन बेल.
