AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शामर जोसेफरवर 11 महिलांकडून गंभीर आरोप, हेड कोच डॅरेन सॅमी म्हणाला…

Darren Sammy Reacts On Allegation On Shamar Joseph :वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजावर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान 11 महिलांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरुन विंडीजच्या मुख्य प्रशिक्षकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शामर जोसेफरवर 11 महिलांकडून गंभीर आरोप, हेड कोच डॅरेन सॅमी म्हणाला...
Daren Sammy Press ConferenceImage Credit source: Icc X account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 02, 2025 | 7:43 PM
Share

वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विंडीच्या या खेळाडूवर 11 महिलांकडून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विंडीज सध्या मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान हे प्रकरण समोर आलं आहे. आता या प्रकरणावर विंडीजचा हेड कोच आणि माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात न्याय मिळणं खूप महत्वाचं आहे. जे काही सत्य असेल ते समोर यायला हवं, असं सॅमीने म्हटलं.

सर्वांसोबत न्याय व्हावा :डॅरेन सॅमी

“मला या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती नाही. मात्र आम्हाला माध्यमांत जे काही सुरु आहे त्याबाबत माहित आहे. खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली रहावी यासाठी मी त्यांच्यासोबत संवाद साधत आहे”, असं सॅमीने म्हटलं.

“आमचा न्याय यंत्रणेवर विश्वास आहे. आम्ही न्यायावर विश्वास ठेवतो. न्याय मिळावा, असं आमच्या समुहाला वाटतं. मात्र त्यासाठी एक प्रक्रिया आहे. हे संपूर्ण प्रकरण यंत्रणेद्वारे निकाली निघावं. एक कोच आणि क्रिकेट बोर्ड म्हणून सर्वांसोबत न्याय व्हावा, हेच मला अपेक्षित आहे”, असंही सॅमीने स्पष्ट केलं.

“शामरवर आरोप करण्यात आले आहेत. न्यायासाठी एक प्रक्रिया असते आणि त्यासाठी वेळ लागतो, याबाबत आम्हाला माहित आहे. त्यामुळे खरं काय ते समोर येण्यासाठी आम्हाला प्रतिक्षा करावी लागेल”, असं विंडीच्या हेड कोचने सांगितलं.

नक्की प्रकरण काय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शामर जोसेफ याच्यावर 11 महिलांकडून लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोसेफने 3 मार्च 2023 रोजी न्यू अॅमस्टरडॅममध्ये माझ्यासह गैरवर्तन केलं. तसेच शामरने मला हे प्रकरण दाबण्यासाठी पैशांचीही ऑफर दिली होती, असा आरोप एका पीडितीने केला. मात्र या प्रकरणात अजून कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत.

ऑस्ट्रेलियाचा विंडीज दौरा

दरम्यान ऑस्ट्रेलिया विंडीज दौऱ्यात कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा 3 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 12 जुलैपासून होणार आहे. त्यानंतर 20 ते 28 जुलै दरम्यान उभयसंघात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा