
गेल्या काही महिन्यांपासून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर चर्चेत आहे. अनायाचे आधीचे नाव आर्यन होते, मात्र लिंग बदलाची सर्जरी करून आर्यन आता अनाया बनली आहे. अनाया बांगर कोण आहे? ती काय करते? याबाबत तुम्हाला माहिती असेल. मात्र आज आपण अनाया बांगरचे शिक्षण किती आहे? ते तिने कसे पूर्ण केले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अनाया बांगरने शिक्षणाबद्दल स्वतः माहिती दिलेली आहे. ती एमए पास आहे मात्र ती एमए पास कशी झाली यामागे एक ट्विस्ट आहे. अनाया बांगर सध्या ‘राईज अँड फॉल’ नावाच्या रिअॅलिटी शो मध्ये दिसत आहे. या शो मध्ये अनायाने एमए पास होण्यामागील कहाणी सांगितली आहे. अनायाने काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.
अनाया बांगरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये अनाया बांगर तिने एमए कसे पास केले याबद्दल माहिती सांगितली आहे. अनाया माहिती सांगत असताना इतर स्पर्धकगी तिच्यासोबत होते. एका स्पर्धकाने तिला सत्य सांगू नको असा सल्ला दिला असल्याचेही दिसत आहे.
अनायाने आपल्या एमए पदवीबद्दल बोलताना सांगितले की, माझ्या पदवीसाठी मला CHAT GPT ची मदत झाली. Chat GPT च्या मदतीने मी एमएची डिग्री घेतली. हे ऐकल्यानंतर शोमधील सर्व स्पर्धकांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला सगळं सत्य सांगायचे नसते असा सल्ला दिला, यावर तिने म्हटलं की, मी क्रिकेटपटू आहे. मला याचा फरक पडत नाही.
अनाया बांगरने भारतीय खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान सारख्या क्रिकेटपटूंसोबत अंडर एज क्रिकेटमध्ये खेळले आहे. त्यावेळी अनायाचे नाव आर्यन असे होते. आता ती मुलापासून मुलगी बनली आहे, मात्र तरीही ती क्रिकेटमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती अनेकदा क्रिकेटचा सराव करत असते. याचे सर्व ती व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत राहते.