
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने कात टाकली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गिल पर्वाचा उदय झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कसोटी कर्णधारपदी कोण असेल? याची खलबतं सुरु होती. ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या नावांची चर्चा होती. इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयपुढे नव्या कर्णधाराची घोषणा करण्याचं मोठं आव्हान होते. पण बीसीसीआयने वरील सर्व नावांना डावलून 25 वर्षीय शुबमन गिलचा विचार केला. तसेच त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. शुबमन गिल हा टीम इंडियाचा 37वा कसोटी कर्णधार असणार आहे. शुबमन गिलला कर्णधारपद सोपण्याआधी असं सर्व घडलं शुबमन गिलला कर्णधारपद देण्याचा निर्णय काही अचानक झालेला नाही. बीसीसीआय कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे सोपण्यापूर्वी त्याची चाचपणी करत होती. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर बीसीसीआयने झिम्बाब्वे...