वैभव सूर्यवंशीला नेमकं काय झालं? खिन्न मनाने एकांतात बसला आणि सहकारी खेळाडूंनी काढली समजूत Video

आयपीएल 2026 स्पर्धेतील 28व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि केकेआर आमनेसामने आले होते. या सामन्यात केकेआरने राजस्थानला 4 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशी खिन्न मनाने एकांकात बसलेला दिसला. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात..

वैभव सूर्यवंशीला नेमकं काय झालं? खिन्न मनाने एकांतात बसला आणि सहकारी खेळाडूंनी काढली समजूत Video
वैभव सूर्यवंशीला नेमकं काय झालं? खिन्न मनाने एकांतात बसला आणि सहकारी खेळाडूंनी काढली समजूत Video
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 20, 2026 | 4:19 PM

Vaibhav Sooryavanshi Video: वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय क्रिकेटमधील चमचमता तारा आहे. त्यामुळे त्याची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींचा उत्साह असतो. असं असताना वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यानंतरचा आहे. या व्हिडीओ वैभव सूर्यवंशी खिन्न मनाने बसलेला दिसत आहे. त्यामुळे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला झालं तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतकं वाईट वाटण्याचं कारण काय? वगैरे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं केकेआर आणि राजस्थान रॉयल्स सामन्याशी निगडीत आहेत. वैभव सूर्यवंशी खिन्न होण्याचं कारण म्हणजे राजस्थान रॉयल्सचा या स्पर्धेतील दुसरा पराभव आहे.

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी नमन पुरस्कार सोहळ्यात वैभव सूर्यंवशीने काय सांगितलेले आठवतं का? या सोहळ्यात त्याने आपल्या ध्येयाबाबत सांगितलं होतं. तेव्हा त्याने सांगितलं होतं की यावेळेस राजस्थान रॉयल्स जेतेपद मिळवणार. हे ध्येय गाठण्यासाठी राजस्थान रॉयल्सने चांगली सुरूवात केली. पण मागच्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सच्या क्रमवारीत फरक पडला आहे. राजस्थान रॉयल्स संघ 8 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे आता पुढची स्पर्धा तीव्र होत जाणार आहे.

राजस्थान रॉयल्सचा पहिला पराभव सनरायझर्स हैदराबादकडून, तर दुसरा पराभव कोलकाता नाईट रायडर्सकडून झाला. राजस्थान रॉयल्सने विजयी चौकार मारल्यानंतर सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. केकेआरविरुद्धच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी एकांतात बसला होता. यावेळी उदास असल्याचं स्पष्ट दिसत होता. त्यामुळे त्याची संघातील इतर खेळाडू समजूत काढत होते. वैभवने केकेआरविरुद्धच्या सामन्यात 28 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. यात दोन षटकार आणि 6 चौकार मारले होते. पण वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला. वैभव सूर्यवंशीच्या रुपाने पहिला धक्का बसला होता. पण संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. वैभव मैदानात असताना संघाच्या 8.4 षटकात 81 धावा होत्या. पण त्यानंतर 20 षटकात 9 गडी बाद 155 धावा झाल्या. केकेआरने हा सामना 19.4 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केल्या.

Follow Us