Virat Kohli | कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला, तेव्हा विराटने झळकावले होते द्विशतक

विराट कोहलीने कसोटी सामन्यांचे कर्णधारपद सोडले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 40 कसोटी सामने जिंकले आहेत.

Virat Kohli | कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला, तेव्हा विराटने झळकावले होते द्विशतक
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 11:35 AM

विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा (resigned) दिला आहे. त्याचा हा निर्णय धक्कादायक आहे. याआधी कोहलीला वनडे आणि टी-२० च्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 40 कसोटी सामने जिंकले आहेत. यातील एक सामना अतिशय खास आणि संस्मरणीय होता. हा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला गेला. यामध्ये कोहलीच्या द्विशतकामुळे भारताने एक डाव आणि 92 धावांनी विजय मिळवला. 2016 मध्ये टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. यादरम्यान, 21 जुलैपासून उभय संघांमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून मुरली विजय आणि शिखर धवन सलामीला आले. मुरली जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 7 धावा करून बाद झाला. यानंतर चेतेश्वर पुजारा 16 धावा करून बाद झाला.

283 चेंडूंचा सामना करत 200 धावा

पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली क्रीजवर पोहोचला. त्याने धवनसोबत चांगली भागीदारी केली. पण त्यानंतर धवन वैयक्तिक 84 धावांवर बाद झाला. त्याने 147 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारही लगावला. धवननंतर अजिंक्य रहाणे 22 धावांवर वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. यानंतर रविचंद्रन अश्विन कोहलीसोबत खूप खेळला. त्याने 253 चेंडूत 113 धावा केल्या. त्याचवेळी विराटने 283 चेंडूंचा सामना करत 200 धावा केल्या. कर्णधार कोहलीचे हे शतक संस्मरणीय ठरले. कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने 566 धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघ पहिल्या डावात 243 धावा आणि दुसऱ्या डावात 231 धावा करत सर्वबाद झाला. अशा प्रकारे टीम इंडिया कोहलीच्या नेतृत्वाखाली हा सामना एक डाव आणि 92 धावांनी जिंकला.

#Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन

#Virat Kohli: विराटच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे ‘हे’ पाच प्रश्न निर्माण झाले, त्याची उत्तर कधी मिळणार?

#ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम

#ViratKohli: कॅप्टनशिप सोडताना विराटने धोनीचे आभार का मानले ?