AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#ViratKohli: कॅप्टनशिप सोडताना विराटने धोनीचे आभार का मानले ?

विराटने राजीनामा देताना जे पत्र पोस्ट केलय, त्यात त्याने बीसीसीआय, संघ सहकारी, रवी शास्त्री यांच्याबरोबरीने एमएस धोनीचेही आभार मानले आहेत.

#ViratKohli: कॅप्टनशिप सोडताना विराटने धोनीचे आभार का मानले ?
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 7:41 PM
Share

#ViratKohli: टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli resign) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने टि्वटवर पोस्ट करुन कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कालच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी (south Africa test) मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव झाला होता. विराट कोहलीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अनेकांना हैराण करुन सोडणारा आहे. कारण भारतीय संघात सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र होतं. मग विराटने अचानक राजीनामा का दिला? असा प्रश्न निर्माण होतोय.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने पत्रकार परिषद घेतली होती. त्यात कर्णधारपदाच्या विषयावर त्याने भाष्य केलं होतं. त्यावरुन बराच वाद झाला होता. टी-20, आणि वनडेची कॅप्टनशिप सोडू नको, असे आपण विराटला सांगितले होते. असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते. पण बीसीसाआयकडून कोणीही आपल्याला कॅप्टनशिप सोडताना अडवलं नाही असं विराटने सांगितलं. त्यामुळे विराट आणि सौरव यांच्या नेमकं खरं कोण बोलतय? असा प्रश्न निर्माण झाला होता.

धोनीचे का आभार मानले? विराटने राजीनामा देताना जे पत्र पोस्ट केलय, त्यात त्याने बीसीसीआय, संघ सहकारी, रवी शास्त्री यांच्याबरोबरीने एमएस धोनीचेही आभार मानले आहेत. कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तसेच भारतीय क्रिकेटला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची धोनीला माझ्यामध्ये जी क्षमता दिसली. त्या बद्दल धोनीचे मनापासून आभार, असे विराटने त्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

(virat kohli resigns from test captaincy thanks to ms dhoni in statement)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.