Ravi Kumar: ‘काय आतापासूनच तू…’ अंडर 19 वर्ल्डकपमधल्या मुलाने विचारलेल्या थेट भिडणाऱ्या प्रश्नावर विराटचं उत्तर

| Updated on: Feb 07, 2022 | 12:08 PM

“विराट कोहली तुमच्यासोबत खूप चांगला संवाद झाला. आयुष्य आणि क्रिकेटबद्दल महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. यातून अजून आमच्यामध्ये सुधारणा होईल” असे राजवर्धनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Ravi Kumar: काय आतापासूनच तू... अंडर 19 वर्ल्डकपमधल्या मुलाने विचारलेल्या थेट भिडणाऱ्या प्रश्नावर विराटचं उत्तर
Follow us on

मुंबई: अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलआधी माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) युवा संघासोबत व्हर्च्युअल संवाद साधला होता. त्याने इंग्लंड विरुद्धच्या (India vs England) फायनलआधी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या होत्या. टीममधील खेळाडूंनी सुद्धा विराट सोबतच्या या व्हर्च्युअल संवादाचे स्क्रिनग्रॅब शेअर करुन खूप सुंदर अनुभव असल्याचं म्हटलं होतं. “विराट कोहली तुमच्यासोबत खूप चांगला संवाद झाला. आयुष्य आणि क्रिकेटबद्दल महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. यातून अजून आमच्यामध्ये सुधारणा होईल” असे राजवर्धनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. यावेळी युवा खेळाडूंनी सुद्धा विराट कोहलीला काही प्रश्न विचारले होते. डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारला (Ravi kumar) ज्यावेळी प्रश्न विचारण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने ‘तुझी कमकुवत बाजू काय आहे? असा थेट प्रश्न विचारला.’

त्यावर विराटने गमतीने ‘काय आतापासूनच मला आऊट करण्याची प्रॅक्टीस करतोयस का?’ असं म्हटलं. रवी कुमारने यंदाचा अंडर 19 वर्ल्डकप गाजवला. त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना तडाखा दिला. क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेश आणि फायनलमध्ये इंग्लंडचा संघ त्याने सुरुवातीला दिलेल्या धक्क्यातून शेवटपर्यंत सावरु शकले नाही. मूळचा उत्तर प्रदेशचा पण आता बंगालकडून खेळणारा या तरुण खेळाडुने भविष्याबद्दल अपेक्षा निर्माण केली आहे.

त्याला पाहून न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची आठवण येते
फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध रवी कुमारने चार विकेट घेतल्या. रवी कुमार दुसरा भारताचा यशस्वी गोलंदाज आहे. त्याने सहा सामन्यात 13.20 च्या सरासरीने 3.66 इकॉनमीने 10 विकेट घेतल्या. भारताकडून विक्की ओस्टवालने सर्वाधिक 12 विकेट घेतल्या. अंडर 19 मधील या कामगिरीनंतर IPL 2022 च्या ऑक्शनमध्येही रवी कुमारवर जास्त बोली लागू शकते. वेग आणि स्विंग गोलंदाजी त्याची ताकत आहे. स्विंग चेंडूनी फलंदाजाला चकवण्याची त्याची क्षमता आहे. त्याची गोलंदाजी पाहून अनेकांना न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची आठवण येते.

विराटने उत्तर टाळलं असेल, पण…
विराटने रवी कुमारच्या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. पण मैदानावर सध्या विराटचा फॉर्म फार चांगला नाहीय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये तो चार चेंडूत 8 धावा बनवून आऊट झाला. पुन्हा एकदा विराटच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:
Hrishikesh Kanitkar: …आणि अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचे पुणेकर कोच कानिटकरांनी पाकिस्तानला दिला होता तडाखा
विराटचं मन थाऱ्यावर नाही, WI विरुद्धच्या 4 चेंडूंच्या खेळीनंतर आकाश चोप्राची सडकून टीका
IND vs WI: ‘मी संघातील सदस्यांना सांगिन की…’,पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला….

When U-19 star Ravi Kumar asked Virat Kohli What is your weakness?