
भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम गोलंदाजी करावी लागली. खरं तर हा निर्णय रोहित शर्माच्या मनासारखा झाला होता. भारताने बांगलादेशला 228 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 229 धावा मिळाल्या. खरं तर सुरुवातीला हे आव्हान सोपं वाटत होतं. पण जस जसा सामना पुढे जात होता, तसं हे आव्हान कठीण वाटत होतं. भारताकडून शुबमन गिलने एका बाजूने सावध खेळी करत खिंड लढवली. शुबमन गिलने 129 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताने 46.3 षटकात बांगलादेशने दिलेलं आव्हान गाठलं. या सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने पराभवाचं कारण सांगितलं. नेमकं काय चुकलं ते सांगितलं.
‘पॉवरप्लेमध्ये पाच विकेट गमावल्याने आम्हाला सामना महागात पडला. मला वाटतं हृदयॉय आणि जाकेरने शानदार फलंदाजी केली पण तरीही आम्ही मैदानावर चुका केल्या. झेल सोडले आणि काही रन-आउट सुटले, निकाल वेगळा असू शकला असता. हृदयॉय आणि जाकेरने त्यांच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध प्रभावी फलंदाजी केली. मला आशा आहे की ते असेच करत राहतील.’, असं बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो सांगितलं.
‘जर आम्हाला नवीन चेंडूने विकेट मिळाल्या असत्या तर ते वेगळे असू शकले असते. आम्ही अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध खेळलो आहोत आणि मला खात्री आहे की मुले रावळपिंडीतील परिस्थितीशी जुळवून घेतील.’, पुढच्या सामन्यात जिंकू असा विश्वास बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने व्यक्त केला.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (डब्ल्यू), मेहिदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (डब्ल्यू), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.