
आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने बलाढ्य असा मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध आतापर्यंत एकूण सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्याने लखनौ सुपर जायंट्सला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला असून सहाव्या स्थानी विराजमान आहे. खरं तर 18व्या षटकापर्यंत हा सामना मुंबई इंडियन्सच्या पारड्यात झुकलेला होता. पण शार्दुल ठाकुर आणि आवेश खानने सामना खेचून आणला. या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर खूश होता. याची प्रचिती पत्रकार परिषदेत आली. पत्रकार परिषदेत एक फोन वाडला आणि त्याने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं. लँगर लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या फिटनेसवर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत होता. तेव्हा डेस्कवर ठेवलेल्या एका रिपोर्टरचा फोन वाजला.
जस्टीन लँगरचं उत्तर देताना लक्ष त्या फोनकडे गेलं. तेव्हा त्याने विचारल की, ‘माँ कोण आहे?’ (Who is Maa) कोणाची माँ फोन करत आहे? तुम्हाला असं वाटतं का मी त्यांना उत्तर देऊ? हॅलो, माँ.. आता 12 वाजून 8 मिनिटं झाली आहेत. मी एका पत्रकार परिषदेत आहे.’ लँगरचा असा अंदाज पाहून पत्रकार परिषदेतील प्रत्येक जण हसू लागला. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसाल हे मात्र नक्की
A phone call in the middle of the press conference 📞
Good news on Mayank Yadav’s recovery 📰
And the importance of National Cricket Academy (BCCI’s COE) 👏
🎥 #LSG Head Coach, Justin Langer, has a field day at the post-match press conference 😊#TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/JAolaa5GTo
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी वेगवान गोलंदाज मयंक यादवबाबत महत्त्वाची अपडेट दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज 90-95 टक्के फिट आहे. यापूर्वीच्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं. त्यामुळे बरीच टीका झाली होती. पण मुंबई इंडियन्सला पराभूत करत विरोधकांना शांत केलं आहे. आता लखनौ सुपर जायंट्स 8 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. यापूर्वी हा सामना 6 एप्रिलला होणार होता. पण रामनवमीमुळे 8 एप्रिलला ढकलण्यात आला आहे.