IPL: यशस्वी जयस्वालसाठी विकेटचं बलिदान देणाऱ्या jos buttler बीसीसीआयने का ठोठावला दंड

युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने 13 चेंडूत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. पण या सामन्यात जोसवर दंड ठोठावण्यात आलाय.

IPL: यशस्वी जयस्वालसाठी विकेटचं बलिदान देणाऱ्या jos buttler बीसीसीआयने का ठोठावला दंड
| Updated on: May 12, 2023 | 8:34 PM

कोलकाता : राजस्थान रॉयल्सचा बॅट्समन जोस बटलरला आयपीएल सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जोस बटलर खाते न उघडता रनआऊट झाला. यशस्वी जैस्वाल आऊट होऊ नये म्हणून त्याने आपल्या विकेटचे बलिदान दिले होते. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 11 मे रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे झालेल्या IPL सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला त्याच्या मॅच फीच्या 10% दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएलने म्हटले आहे. राजस्थान रॉयल्सने हा सामना नऊ गडी राखून जिंकला.

बटलरने स्वीकारला गुन्हा

‘बटलरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा स्वीकारला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल वन भंग केल्यामुळे मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेटच्या बदल्यात 149 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने दोन विकेट्स घेतल्या. संदीप शर्मा आणि आसिफने प्रत्येकी एक विकेट घेतली.

यशस्वीची धुंवादार खेळी

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला यशस्वी जैस्वालने जोरदार सुरुवात केली. यशस्वीने 47 चेंडूंत 13 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 98 धावा केल्या. त्याचे शतक दोन धावांनी हुकले तर संजू सॅमसनने केवळ 29 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 48 धावा ठोकल्या. या विजयासह राजस्थान गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

शतक हुकले

राजस्थान रॉयल्सने पॉइंट टेबलमध्ये टॉप-३ मध्ये स्थान मिळवले. युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने 13 चेंडूत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. जयस्वालचे दुसरे आयपीएल शतक हुकले कारण विजयासाठी तीन धावांची गरज असताना डावखुरा फलंदाज 94 धावांवर खेळत होता. अशा स्थितीत त्याला आवश्यक षटकार मारता आला नाही, मात्र चौकार मारल्यानंतर सामना संपल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.