
मुंबई : टीम इंडिया जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-0 ने आधीच खिशात घातली आहे. तर तिसरा टी20 सामना औपचारिक असणार आहे. या मालिकेत फिरकीपटू रवि बिष्णोई याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वर्षभरानंतर टीम इंडियामध्ये कमबॅक केलं 2 सामन्यात 4 गडी बाद केले आहे. सध्या तो जबरदस्त फॉर्मात आहे. असं असताना रवि बिष्णोई विकेट घेतल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं सेलेब्रेशन करतो. या सेलेब्रेशनकडे पाहिल्यानंतर शाहिद आफ्रिदी आणि शाहीन आफ्रिदी यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. कारण विकेट घेतल्यानतर रवि विष्णोई हा आफ्रिदीप्रमाणे पाय लांब करून दोन्ही वर व्ही शेपमध्ये लांब करतो. बिष्णोई असं सेलिब्रेशन का करतो याबाबत खुलासा टीममेट रिंकू सिंह याने केला आहे.
बीसीसीआयने रवि बिष्णोई आणि रिंकू यांच्या चर्चेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात रिंकू सिंह याने रवि विष्णोई याला विचारलं की, विकेट घेतल्यानंतर हात पसरवून सेलेब्रेशन का करतो? तेव्हा रवि बिष्णोई याने या प्रश्नाचं दिलखुलासपणे उत्तर दिलं. “सर्वांची सेलिब्रेशन करण्याची पद्धत असते. पण माझ्याकडे असं काहीच नव्हतं म्हणून हात पसरवून आनंद साजरा करू लागतो. कारण वरच्याच्या कृपेनेच विकेट मिळतात. त्याचे आभार व्यक्त करतो.”
The joy of maiden Player of the Match award 😃
Unconditional love from the fans 🤗
Secret behind wicket celebration 🙌In conversation with Dublin Stars @rinkusingh235 & Ravi Bishnoi 👌👌 – By @RajalArora
Full Interview 🎥🔽 #TeamIndia | #IREvINDhttps://t.co/SsCfxMcNBo pic.twitter.com/mcZMhBbJ8d
— BCCI (@BCCI) August 21, 2023
रिंकू सिंह याने या उत्तरानंतर खास सल्ला दिला आहे. रिंकूने सांगितलं की, “SRK पण असंच काहीसं करतो. त्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न कर.” यावर रवि बिष्णोई याने पुढच्या वेळी विकेट घेतल्यानंतर एसआरकेसारखं सेलिब्रेशन करून इच्छा पूर्ण करेन. हा सल्ला आता रवि बिष्णोई फॉलो करतो की नाही याबाबत पुढची विकेट घेतल्यानंतर समोर येईल.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.