AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…यासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून रोहित शर्मा उतरला, पियुष चावलाने सर्वकाही केलं उघड

आयपीएल 2024 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता मुंबई इंडियन्सला प्रतिष्ठेसाठी उर्वरित तीन सामने खेळावे लागणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडिन्सने 11 पैकी 8 सामने गमावले आहेत. कोलकात्याविरुद्धचा सोपा सामनाही गमावला आहे. यानंतर फिरकीपटू पियुष चावलाने मन मोकळं केलं आहे.

...यासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून रोहित शर्मा उतरला, पियुष चावलाने सर्वकाही केलं उघड
| Updated on: May 04, 2024 | 2:07 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला 24 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर मुंबईच्या प्लेऑफच्या सर्वच आशा धुळीस मिळाल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिग्गज खेळाडू असूनही पराभवाची मालिका सुरुच राहिली. हातातोंडाशी असलेला विजयाचा घास खाता आला नाही. यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स चांगलेच संतापलेले दिसत आहेत. ते आपला सर्व राग सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. अशात मुंबई इंडियन्सच्या रणनितीत बराच अभाव दिसून आला. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात तर रोहित शर्मा डगआऊटमध्ये बसला होता. त्याला इम्पॅक्ट सब्सिट्यूट म्हणून घेतलं होतं. त्यावरूनही प्रश्नांचा भडीमार होत आहे. कारण गोलंदाजीवेळी रणनिती ठरवताना रोहित शर्मा मैदानात नव्हता. त्यामुळे 57 धावांवर 5 विकेट असूनही कोलकाता नाईट रायडर्सने 170 धावांपर्यंत मजल मारली. मात्र रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर्स निवडण्यामागे कारण होतं. याबाबत फिरकीपटू पियुष चावलाने खुलासा केला आहे. पियुष चावलाने सांगितलं की, रोहित शर्माच्या पाठीत दुखापत होती म्हणून त्याला प्लेइंग 11 मध्ये सहभागी केलं नाही.

कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला होता. त्याने 12 चेंडूत 11 धावा केल्या आणि बाद झाला. चावलाने सांगितलं की, “रोहित शर्माच्या पाठीत थोडी दुखापत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवडलं. आम्ही आत्मसन्मानासाठी मैदानात उतरलो होतो. आपण क्वॉलिफाय होऊ की नाही ते ठरवून उतरत नाहीत. प्रत्येक जण नावासाठी खेळतो. आम्हीही त्यासाठीच खेळतो. सर्वांनाच माहिती आहे की, टी20 हा लय असलेला खेळ आहे. आम्हाला या स्पर्धेत सूर गवसला नाही. ये कोणत्याही संघासोबत होऊ शकतं. असं आमच्यासोबत पहिल्यांदा झालं नाही. कोणत्याही संघासोबत होऊ शकतं.”

आयपीएल स्पर्धेत पियुष चावलाने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ड्वेन ब्रावो मागे टाकत 35 वर्षीय पियुष चावला सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. पियुष चावला आतापर्यंत 184 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने याबाबत बोलताना सांगितलं की, “आयपीएल 17 वर्षापूर्वी सुरु झालं होतं. तेव्हा फिरकीपटूंना प्राधान्य दिलं जात नव्हतं. पण भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पाहिली तर त्यात अश्विन, चहल आणि मी सहभागी आहे. सर्वच फिरकीपटू आहेत. ही एक चांगली बाब आहे.”

Follow Us
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?