रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांची निवृत्ती घेण्यासाठी एक अडचण! तसं केलं तर….
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येत आहे. पण काही खेळाडू संघातून डावललं जात असतानाही निवृत्ती घेत नाही. असं असताना या खेळाडूंबाबत एक आश्चर्यकारक दावा केला जात आहे. रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीसमोर या अडचणी असण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेटविश्वात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहे. बीसीसीआयची महत्त्वाची बैठक 3 सप्टेंबरला पार पडणार आहे. या बैठकीत रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा भाग असेल की नाही हे ठरण्याची शक्यता आहे. असं असताना या निमित्ताने दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारसारख्या दिग्गज खेळाडू क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं मानलं जात आहे. निवड समितीही या खेळाडूंचा फार काही विचार करत नसून इतर पर्याय शोधले आहेत. पण असं असूनही हे दिग्गज खेळाडू निवृत्ती का घेत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहित शर्मा संघात असेल की नाही हे माहिती नाही. पण मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना संघात स्थानच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
एका रिपोर्टनुसार, ब्रँड व्हॅल्यूमुळे रोहित शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा निवृत्ती घेत नाहीत. निवृत्ती घेतल्यास आयपीएल करार, ब्रँड डील आणि इतर संधी अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे हे खेळाडू पैशांसाठी निवृत्ती घेत नाहीत का? असा प्रश्न आहे. पण या रिपोर्टमुळे संभ्रम वाढला आहे. दुसरीकडे, संघात पदार्पण करण्यासाठी रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार चांगली कामगिरी करत आहेत.
निवृत्तीच्या बातम्या समोर येत असताना रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार अजून जोर लावून कामगिरी करत आहेत. रोहित शर्माने मागच्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली. तर भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2026 स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इतकंच काय तर या पर्वात 26 विकेट काढल्या. युपी टी20 लीगमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तर मोहम्मद शमीही दुलीप ट्रॉफी स्पर्धेत चमकला आहे. उपांत्य फेरीत पाच विकेट काढत संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं. पण संघात त्यांचा विचार केला जात नाही.