T20 World Cup: जसप्रीत बुमराहच्या जागी Umran Malik ला टीममध्ये घेण्याचे तीन फायदे जाणून घ्या….

| Updated on: Oct 07, 2022 | 6:54 PM

T20 World Cup: उमरान मलिक वर्ल्ड कपमध्ये घालू शकतो धुमाकूळ, कसं ते समजून घ्या....

T20 World Cup: जसप्रीत बुमराहच्या जागी Umran Malik ला टीममध्ये घेण्याचे तीन फायदे जाणून घ्या....
Dravid-Umran
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाली आहे. पुढच्या काही दिवसात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) स्पर्धा सुरु होईल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आधीच बाहेर गेला आहे. बीसीसीआयने अजूनपर्यंत बुमराहच्या जागी कोण खेळणार? ते जाहीर केलेलं नाही.

या शर्यतीत मोहम्मद शमी, दीपक चाहर, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक आहे. मोहम्मद शमी आणि दीपक चाहर स्टँडबाय खेळाडूंमध्ये आहेत. मोहम्मद शमीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. पण त्याला संधी दिल्यास तीन फायदे होऊ शकतात. कदाचित उमरान मलिक या टुर्नामेंटमधून चांगला गोलंदाज म्हणून समोर येऊ शकतो. पण त्यासाठी बीसीसीआयला त्याची निवड करुन एक धोका पत्करावा लागेल. कारण उमरान मलिकडे अनुभवाची मोठी कमतरता आहे. उमरान मलिकला टीममध्ये घेऊन काय तीन फायदे होऊ शकतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

  1. आयपीएल 2022 मध्ये टॉप 5 वेगवान चेंडूंमध्ये तीन उमरान मलिकने टाकले होते. त्याने 157 kmph, 155.6 kmph आणि 154.8 kmph वेगाने चेंडू टाकले. दीपक चाहर, हर्षल पटेल किंवा अर्शदीप सिंहकडे ही क्षमता नाहीय. उमरान मलिक आयपीएलमध्ये सर्वाधिक 22 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. मोहम्मद शमीने 20 आणि हर्षल पटेलने 19 विकेट घेतल्या.
  2. सिराज आणि उमेश यादवकडे भले अचूकता असेल, पण गती नाहीय. ऑस्ट्रेलियात उसळी आणि वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर प्रत्येक टीममध्ये एक स्पीड स्टार आहे. टीम इंडियाकडे असा एकही गोलंदाज नाहीय.
  3. टी 20 फॉर्मेटमध्ये जसप्रीत बुमराह काही ओव्हर्स सुरुवातीला पावरप्लेमध्ये नंतर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना दिसतो. उमरान मलिक मधल्या ओव्हर्समध्ये उपयुक्त ठरु शकतो. उमरान आपल्या वेगाने फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. धावांचा वेग मंदावू शकतो.