
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. अभिषेक शर्मा आणि हार्षित राणा वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.या सामन्यात अभिषेक शर्माने 37 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 68 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट होता. तर हार्षित राणाने 33 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत 35 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय इतर फलंदाजींनी दुहेरी आकडाही गाठला नाही. इतकंच काय तर तीन फलंदाजांना तर खातंही खोलता आलं नाही. पण या सामन्यात अष्टपैलू शिवम दुबेच्या आधी हार्षित राणाला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे गौतम गंभीरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. भारताने सामना गमावल्यानंतर अभिषेक शर्माने या प्रश्नाचं उत्तर दिलं. या निर्णयामागचं खरं कारण काय ते सांगितलं.
अभिषेक शर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेल्यानंतर त्याला हार्षित राणाच्या बॅटिंग प्रमोशनबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा अभिषेक शर्मा म्हणाला की, ‘पहिलं तर हार्षित राणा फलंदाजी करतो. ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण नेट्समध्ये तो माझ्या चेंडूवर षटकार मारतो. यासाठी प्लान ठरलेला होता की आम्हाला लेफ्ट हँड आणि राइट हँड कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. यासाठी हार्षित राणाला शिवम दुबेच्या आधी फलंदाजीला पाठवण्यात आलं आहे. त्याला मी इतकंच बोललो की नॉर्मल खेळायचं आहे. त्यामुळे आम्ही चांगली भागीदारी करू शकू.’
भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमवून 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भारतीय गोलंदाजांनी त्यातल्या काही संघर्ष देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाला या धावांचा पाठलाग करण्यापासून रोखताना 6 विकेट घेतल्या. जर ही धावसंख्या 180 च्या पार असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. आता भारताला ही मालिका जिंकण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकणं भाग आहे. तिसरा सामना गमावला तर मालिका वाचवण्यासाठी धडपड करावी लागेल.