WI vs AUS : विंडीजसाठी करो या मरो सामना, ऑस्ट्रेलियाला सीरिज जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान

West Indies vs Australia 2nd Test Live Streaming : वेस्ट इंडिज क्रिकेट टीम आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपला पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे विंडीजसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा सामना हा अटीतटीचा आहे.

WI vs AUS : विंडीजसाठी करो या मरो सामना, ऑस्ट्रेलियाला सीरिज जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान
Mitchell Starc WI vs AUS Test Cricket
Image Credit source: windies cricket x account
| Updated on: Jul 03, 2025 | 2:34 AM

दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून गतविजेत्यांना सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स होण्यापासून रोखलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाने विंडीज विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात विंडीजवर 159 धावांच्या मोठ्या फरकाने धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसऱ्या आणि निर्णायक सामन्याला 3 जुलैपासून सुरु होत आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना कधी?

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना कुठे?

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना हा नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्ज्स, ग्रेनेडा येथे आयोजित करण्यात आला आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.

विंडीजसमोर दुहेरी आव्हान

पॅट कमिन्स या मालिकेत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करत आहे. तर रोस्टन चेज याच्याकडे विंडीजच्या नेतृत्वाची धुरा आहे. ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तर विंडीज या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे विंडीजसाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे. विंडीजला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हानही विंडीजसमोर असणार आहे.

त्यामुळे विंडीजची दुसऱ्या सामन्यात खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे. अशात विंडीज या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.