AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 1st Test | R Ashwin याचा चमत्कार, बापानंतर आता लेकाची विकेट, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी

West Indies vs Team India 1st Test Day 1 R Ashwin World Record | आर अश्विन याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिली विकेट घेत मोठा कीर्तीमान रचलाय

WI vs IND 1st Test | R Ashwin याचा चमत्कार, बापानंतर आता लेकाची विकेट, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 12, 2023 | 11:10 PM
Share

डोमिनिका | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून झाली. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आर अश्विन अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील पहिलाच खेळाडू ठरलाय. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.

नक्की वर्ल्ड रेकॉर्ड काय?

विंडिजकडून बॅटिंगसाठी कॅप्टन क्रॅग ब्रॅथवेट आणि टॅगेनारायण चंद्रपॉल ही जोडी सलामीला आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. आर अश्विन याने ही जोडी फोडत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. अश्विनने चंद्रपॉलला क्लिन बोल्ड केलं. यासह अश्विनने वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.

आणि आर अश्विन याने इतिहास रचला

अश्विनने बाप-बेट्याची विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. टॅगेनरिन हा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याचा मुलगा आहे. अश्विनने टॅगेनरिनला 12 धावावंर आऊट केलं. टॅगेनरिनने 44 बॉलमध्ये ही खेळी केली. दरम्यान अश्विनने शिवनारायण चंद्रपॉल याला 2011 मध्ये एलबीडबल्यू आऊट केलं होतं.

विंडिजचा अर्धा संघ तंबूत

दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांनी विंडिजला झटपट धक्के दिले आहेत. आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर याने 1 विकेट घेत फिरकी जोडीला चांगली साथ दिली. त्यामुळे विंडिजची 31.5 ओव्हरमध्ये 5 बाद 76 अशी झाली. आता टीम इंडियाच्या गोलंदाजांचा विंडिजला झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी