WI vs NEP : नेपाळकडून विंडीजचा सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा, 90 धावांनी मात, रोहितच्या नेतृत्वात ऐतिहासिक मालिका विजय

West Indies vs Nepal 2nd T20I Match Result : वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकत मालिका आपल्या नावावर केली आहे. विंडीजने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.

WI vs NEP : नेपाळकडून विंडीजचा सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा, 90 धावांनी मात, रोहितच्या नेतृत्वात ऐतिहासिक मालिका विजय
Nepal Cricket Team
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Sep 30, 2025 | 1:21 AM

नेपाळ क्रिकेट टीमने रोहित पौडेल याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. नेपाळ क्रिकेट टीमने शारजाह क्रिकेट स्टेडिममध्ये वेस्ट इंडिजवर दुसर्‍या सामन्यात 90 धावांच्या मोठ्या फरकाने मात केली आहे. वेस्ट इंडिजचा हा सलग दुसरा विजय ठरला. विंडीजने या दुसऱ्या विजयासह ऐतिहासिक कामगिरी करत मालिका जिंकली आहे. नेपाळने विंडीजसमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र नेपाळच्या गोलंदाजांसमोर विंडीजने गुडघे टेकले. विंडीजला 17.1 ओव्हरमध्ये 83 धावांवर गुंडाळत नेपाळने लवकर सामना संपवला आणि मालिकेवर नाव कोरलं. नेपाळने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

मोहम्मद आदील आलम, आसिफ शेख आणि सुंदीप जोरा या तिघांनी नेपाळच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. आसिफ शेख आणि सुंदीप जोरा या जोडीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे नेपाळला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 173 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर मोहम्मद आदील आलम याने 174 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या विंडीजला सर्वाधिक 4 झटके देत 83 वर गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. तसेच विंडीजच्या या विजयात इतर खेळाडूंनीही आपलं योगदान दिलं. या ऐतिहासिक विजयानंतर नेपाळमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

असा रंगला सामना

नेपाळने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विंडीजने नेपाळला ठराविक अंतराने झटके दिले. कुशल भुर्टेल 2, रोहित पौडेल 2 आणि कुशल मल्ला 7 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे नेपाळचा स्कोअर 3 आऊट 43 अशी स्थिती झाली. त्यानंतर आसिफ शेख आणि सुंदीप जोरा या जोडीने कमाल केली. आसिफ आणि सुंदीपने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. मात्र दोघांना शतकी भागीदारीत एकही धाव जोडता आली नाही. विंडीजने सुंदीपला आऊट करत ही जोडी फोडली.

सुंदीपने 39 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 63 रन्स केल्या. नेपाळने त्यानंतर 2 विकेट्स गमावल्या. मात्र आसिफ शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्यामुळे नेपाळला 6 विकेट्स गमावून 173 धावांपर्यंत पोहचता आलं. आसिफने 47 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 फोरसह नॉट आऊट 68 रन्स केल्या. विंडीजसाठी अकील हौसेन आणि कायले मेयर्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर जेदीहा ब्लेड्सने 1 विकेट मिळवली.

नेपाळचा ऐतिहासिक मालिका विजय

विंडीजचं पॅकअप आणि नेपाळ विजयी

त्यानंतर नेपाळने विंडीजला सुरुवातीला झटपट 2 झटके दिले. त्यानंतर गोलंदाजांनी ठराविक अंतराने झटके दिले आणि विंडीजला 17.1 ओव्हरमध्ये 83 रन्सवर ऑलआऊट केलं. विंडीजसाठी जेसन होल्डर याने सर्वाधिक 21 धावा केल्या. नेपाळच्या गोलंदाजांनी त्या व्यतिरिक्त विंडीजच्या एकालाही 20 पार पोहचू दिलं नाही. नेपाळसाठी मोहम्मद व्यतिरिक्त कुशल भुर्टेल याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत विंडीजला गुंडाळण्यात योगदान दिलं.