
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा टी20i मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. विंडिजने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर डीएलएसनुसार 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. पावसामुळे हा सामना 13 ओव्हरचा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 108 धावा केल्या. मात्र विंडिजला विजयासाठी डीएलएसनुसार 116 धावांचं आव्हान मिळालं. विंडिजने हे आव्हान 22 बॉलआधी 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. विंडिजने 9.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 116 धावा केल्या.
विंडिजसाठी शाई होप याने सर्वाधिक धावा केल्या. होपने 24 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 42 रन्स केल्या. तर शिमरॉन हेटमायरने 17 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली.त्याआधी निकोलस पूरनने चौफेर फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. पूरनने 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 13 चेंडूत 35 रन्स केल्या. तर अलिक अथानाझे याला 1 धाव करुन माघारी जावं लागंल. दक्षिण आफ्रिकेकडून ओटनील बार्टमन आणि ब्योर्न फॉर्च्युइन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
विंडिजने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स याने सर्वाधिक 40 धावा केल्या. रायन रिकेल्टन याने 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन एडन मार्करमने 20 धावा जोडल्या. रिझा हेंड्रिक्सने 9 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर जे स्मिथ आणि वियान मल्डर या दोघांनी नाबाद 6 आणि 1 धावा जोडल्या. विंडिजच्या रोमरियो शेफर्डने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अकेल होसेन आणि मॅथ्यू फोर्ड या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
विंडिजचा मालिका विजय
Welcome to the winner’s circle.😎🏆#WIvSA | #T20Fest pic.twitter.com/InvkyUbEzg
— Windies Cricket (@windiescricket) August 28, 2024
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : रोस्टन चेस (कर्णधार), अलिक अथानाझे, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, फॅबियन ऍलन, मॅथ्यू फोर्ड, अकेल होसेन, गुडाकेश मोटी आणि ओबेद मॅककॉय.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, जेसन स्मिथ, विआन मुल्डर, पॅट्रिक क्रुगर, ब्योर्न फॉर्च्युइन, लिझाड विल्यम्स, ओटनील बार्टमन आणि क्वेना माफाका.