WI vs SA Head To Head: विंडिज-दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी वरचढ कोण?

West Indies vs South Africa T20i Head To Head Records: विंडिजने गेल्या टी 20i मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला होता. आता त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येण्यासाठी सज्ज आहेत.

WI vs SA Head To Head: विंडिज-दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी वरचढ कोण?
West Indies vs South Africa
Image Credit source: AP/PTI
| Updated on: Aug 22, 2024 | 11:27 PM

दक्षिण आफ्रिका सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेने विंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध टी 20i मालिका खेळण्यासाठी सज्ज आहेत. उभयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहे. रोव्हमन पॉवेल वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मार्रक्रम दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या मालिकेला 24 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या टी2oi मालिकेनिमित्ताने उभयसंघात कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात.

विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टु हेड रेकॉर्ड्स

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत टी 20i क्रिकेटमध्ये एकूण 23 सामने झाले आहेत. या दरम्यान दोन्ही संघ हे तुल्यबल आहेत. दक्षिण आफ्रिकेने विंडिज विरुद्ध 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 11 सामन्यात यश मिळवला आहे. उभयसंघात याआधी मे 2024 मध्ये 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. तेव्हा विंडिजने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा क्लिन स्वीपने पराभव केला होता. त्यामुळे आताही विंडिजची अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला दक्षिण आफ्रिकेची गेल्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी असणार आहे.

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 24 ऑगस्ट

दुसरा सामना, 25 ऑगस्ट

तिसरा सामना, 28 ऑगस्ट

विंडिजची पहिल्या सामन्याआधी जोरदार तयारी

वेस्ट इंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), ॲलिक अथानाझे, फॅबियन ॲलन, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्रक्रम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, क्वेना माफाका, विआन मुल्डर, लुंगी एन्गिडी, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रस्सेन ड्यूसेन आणि लिझाद विल्यम्स.