AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना पुन्हा सोबत घेणार का?; अमित शाह यांचं एका वाक्यात उत्तर काय?

TV9 नेटवर्कच्या च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का असा सवाल करण्यात आला. यावर बोलताना शाहांनी फक्त एका वाक्यात यावर उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे यांना पुन्हा सोबत घेणार का?; अमित शाह यांचं एका वाक्यात उत्तर काय?
| Updated on: Feb 27, 2024 | 9:52 PM
Share

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणूकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कोणते पक्ष महायुतीमध्ये सामील होतात आणि कोणते पक्ष इंडिया आघाडीमध्ये राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर महाराष्ट्रात आता राजकीय गणित बदलली गेली आहेत. भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत मात्र ठाकरे बाजुला पडलेत. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे मात्र शरद पवार नाहीत. वरिष्ठ मंडळ उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

अमित शाहा काय म्हणाले?

मला तुमचीही गरज आहे. तुम्ही ज्वाईन करा. आमचा पक्ष परिवार नियोजन मानते. पक्षातील कार्यकर्त्याचं परिवार नियोजन मानत नाही. भाजपच्या अजेंड्याशी जे सहमत आहेत त्या सर्वांचं भाजपात स्वागत आहे. आमच्या अजेंड्यावर चालायचं आहे फक्त असं शाहा म्हणाले. यावेळी त्यांना नितीश कुमार यांना आणि उद्धव ठाकरे यांन सोबत घेण्याबाबत विचारण्यात आलं.

तुम्ही राँग नंबरवर प्रश्न करत आहात. तुम्ही नितीश कुमार यांना विचारा. आमचा पक्ष फर्म आहे. आमच्या पक्षाचा अजेंडा ज्यांना मान्य आहे, मोदींचा विश्वास ज्यांच्यावर आहे त्यांनी आमच्यासोबत यावं. जनता मतदान करणार आहे. निकाल येऊ द्या. माहीत पडेल कुणाची विश्वासहार्यता वाढली आणि कमी झाली आहे, असं शाहा म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांचं नाव घेताच, यात अगर मगर नाही. कोणतीही हेडिंग मिळणार नाही. थेट निवडणुकीचे प्रश्न विचारा नाही तर तुमची वेळ संपेल, असं म्हणत शाहांनी उत्तरच देणं टाळलं.

भाजपने काँग्रेसच्या अनेक लोकांना भारतरत्न दिला. नरसिंहराव आणि तरुण गोगोईंना भारत रत्न दिला त्यातून काय मिळणार आम्हाला. दादा दादी, आजी आजोबांना भारतरत्न द्यायला ही काँग्रेस नाही. हा भाजप आहे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांना सन्मानित करणार आणि केलां पाहिजे. सरदार पटेल यांना भारत रत्न देण्यासाठी किती वर्ष लागले. चंद्रशेखर आले नसते तर कदाचित तोही मिळाला नसता. भाजपने भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांवर ज्यांचा अधिकार त्यांना तो दिला. पूर्वी पत्रकारांच्या शिफारशींवरही पुरस्कार दिला जायचा म्हणत शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.