
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20i मालिकेतील पाचवा आणि 2025 या वर्षातील शेवटचा सामना हा तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने सलग दुसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल लागला. श्रीलंकेची कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीने भारताला बॅटिंगचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा धुलाई होणार असल्याचं निश्चित झालं आहे. भारताने चौथ्या टी 20i सामन्यात टॉस गमावून बॅटिंग करताना 221 धावांपर्यंत मजल मारली होती. आता महिला ब्रिगेड अंतिम सामन्यात किती धावा करते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
टीम इंडियाचा हा सामना जिंकून श्रीलंकेला 5-0 ने क्लिन स्वीप करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच भारताने मालिका जिंकली असल्याने हा सामना औपचारिकता आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. उपकर्णधार आणि ओपनर बॅट्समन स्मृती मंधाना हीला विश्रांती देणयात आली आहे. स्मृतीच्या जागी 17 वर्षीय जी कामिलिनी हीचं पदार्पण झालं आहे. तर रेणुका सिंह ठाकुर हीच्या जागी ऑलराउंडर स्नेह राणा हीला संधी देण्यात आली आहे. स्मृती नसल्याने आता जी कामिलिनी शफाली वर्मा हीच्यासह ओपनिंग करणार आहे. अशात कामिलिनी पदार्पणात कशी कामगिरी करते? याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.
तसेच श्रीलंकेकडूनही प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. इनोका रनवीरा आणि मलकी मदारा या दोघींचं कमबॅक झालं आहे. तर मलाशा शेहानी आणि काव्या काविंदी या दोघींना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्यात आलं आहे.
भारताची पाचव्या सामन्यात बॅटिंग
🚨 Toss 🚨#TeamIndia have been asked to bat first.
Updates ▶️ https://t.co/E8eUdWSQXs#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/3QAdpQSqDV
— BCCI Women (@BCCIWomen) December 30, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, जी कमलिनी, ऋचा घोष (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी.
श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हसिनी परेरा, चमारी अट्टापट्टू (कर्णधार), इमेषा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षीका सिल्वा, रश्मिका सेवावंडी, कौशली नुथ्यांगना(विकेटकीपर), निमाशा मदुशानी, इनोका रणवीरा आणि मलकी मदारा.