IND vs WI : स्मृती-रिचाचा अर्धशतकी तडाखा, टीम इंडियाचा टी 20 मध्ये हायस्कोअर, विंडीजसमोर 218 धावांचं आव्हान

India vs West Indies 3rd T20i 1st Innings Highlights : कर्णधार स्मृती मंधाना आणि रिचा घोष या जोडीने केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारली.

IND vs WI : स्मृती-रिचाचा अर्धशतकी तडाखा, टीम इंडियाचा टी 20 मध्ये हायस्कोअर, विंडीजसमोर 218 धावांचं आव्हान
Smriti Mandhana and Richa Ghosh
Image Credit source: bcci women X Account
| Updated on: Dec 19, 2024 | 9:03 PM

कर्णधार स्मृती मंधाना आणि रिचा घोष या दोघींच्या विस्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात विंडीजला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. वूमन्स टीम इंडियाची ही टी 20I इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता या तिसऱ्या सामन्यासह कोणती टीम मालिकेवर नाव कोरणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

स्मृती मंधाना हीने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात 47 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 1 षटकारासह एकूण 77 धावांची खेळी केली. स्मृतीचं हे सलग तिसरं आणि एकूण 30 वं टी 20I अर्धशतक ठरलं. स्मृतीने यासह सुझी बेट्स हीच्या सर्वाधिक 29 टी 20I अर्धशतकांचा विश्व विक्रम मोडीत काढला. त्यानंतर रिचा घोष हीने वादळी खेळी केली. रिचाने अवघ्या 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. रिचा टी 20I क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारी संयुक्तरित्या तिसरी महिला फलंदाज ठरली. रिचाने 21 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 54 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्स हीने 39 धावा केल्या. तर राघवी बिष्ट आणि सजीवन सजना दोघी नाबाद परतल्या. राघवीने 22 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 31 रन्स केल्या. तर सजीवन 4 धावांवर नाबाद परतली. विंडीजकडून चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

विंडीजसमोर 218 धावांचं आव्हान

वूमन्स वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनाबी, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, एफे फ्लेचर आणि करिश्मा रामहारक.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रघवी बिस्ट, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.