
वूमन्स टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 3-0 ने विजय मिळवला. त्यानंतर आता वूमन्स टीम इंडियाने मायदेशात विंडिज विरूद्धच्या टी 20i मालिकेत विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने रविवारी 15 डिसेंबरला झालेल्या सामन्यात विंडिजवर 49 धावांनी मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता महिला ब्रिगेड दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. तर विंडिजला मालिकेतील कायम राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. एकूणच विंडिजाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे.
हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर हेली मॅथ्यूज हीच्याकडे विंडिजच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. अशात आता दुसऱ्या सामन्यात कोण विजयी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
वूमन्स इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यातील दुसरा सामना हा मंगळवारी 17 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर
A win by 49 runs in the 1st T20I 🙌#TeamIndia take a 1-0 lead in the three-match T20I series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/0G6LQ3gSPB#INDvWI | @IDFCFirstbank pic.twitter.com/VcsMjUQuVY
— BCCI Women (@BCCIWomen) December 15, 2024
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), नंदिनी कश्यप, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजना सजीवन, रघवी बिस्त, रेणुका सिंह ठाकूर, प्रिया मिश्रा, तीतस साधू, सायमा ठाकोर, मिन्नू मणी आणि राधा यादव.
टी 20i मालिकेसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलिया एलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झायदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.