
जागतिक क्रिकेटमधील एका महान लेग स्पिनरला जग मुकलं आहे. मागच्या आठवड्यात शेन वॉर्नचं (Shane warne) दुर्देवी निधन झालं.

वयाच्या 52 व्या शेन वॉर्नने थायलंडमधल्या एक व्हिलात (Thailand villa) अखेरचा श्वास घेतला. तिथे तो मित्रांसमवेत सुटट्या एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक वॉर्नच निधन झालं.

शेन वॉर्नच्या अकाली मृत्यूमुळे विविध शंका-कुशंका व्यक्त होत होत्या. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं ते जाणून घ्या.

अखेरच्या क्षणी शेन वॉर्न सोबत त्याचे मित्र होते. सर्वप्रथम वॉर्नच्या मित्रानेच त्याला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं. दुपारच्या जेवणासाठी म्हणून तो शेन वॉर्नला बोलवायला त्याच्या रुममध्ये गेला होता. अनेक हाका मारुनही शेन वॉर्न काहीच प्रतिसाद देत नव्हता.

“आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी आम्ही शेन वॉर्नला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं” असं रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितलं. शेन वॉर्नच्या मित्राने त्याला सीपीआर देऊन त्याचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न केला.

शेन वॉर्नचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवल्यानंतर एक महिला रुग्णवाहिकेत गेली होती. ती एकटीच अर्धा मिनिट आतमध्ये होती. रुग्णवाहिकेमध्ये शिरताना तिच्या हातात फुलांचा एक पुष्पगुच्छही होता. ती वॉर्नच्या मृतदेहाजवळ अर्धा मिनिट थांबली होती. ती जर्मन महिला शेन वॉर्नची मैत्रीण होती.

शेन वॉर्नच्या सामुजान विलाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. शेन वॉर्नचा मृत्यू होण्याच्या काही तास आधी काही महिला विला मध्ये आल्याचं समोर आलं आहे. मसाजसाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. शेन वॉर्नच्या मित्रांनी त्यांना मसाजसाठी बोलावलं होतं.

शेन वॉर्नच्या खोलीजवळ गेल्यानंतर तेव्हा आतून काही प्रतिसाद आला नाही. त्याचवेळी त्या महिलेने आपल्या बॉसला सूचित केले होते.

शेन वॉर्नच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर चार महिला रिसॉर्टमधून बाहेर येताना दिसल्या. दोन महिला शेन वॉर्नच्या मित्राची मसाज करत होत्या. शेन वॉर्न जवळ कुठलीही महिला गेली नाही.

शेन वॉर्नचा ह्दयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं म्हटलं आहे.