WIND vs WUAE: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, यूएईवर 78 धावांनी विजय
India Women vs United Arab Emirates Women Highlights In Marathi: वूमन्स आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने यूएईला पराभूत करत सलग दुसर्या विजयाची नोंद केली आहे.

वूमन्स टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात यूएई विरुद्ध 78 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने हरमनप्रीत आणि रिचा घोष या दोघींनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आशिया कप स्पर्धेतील सर्वोच्च धावा केल्या. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. त्यामुळे यूएईला 202 धावांचं आव्हान मिळालं. मात्र यूएईला या धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 123 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलचा दावा आणखी मजबूत केला आहे.
यूएईकडून तिघींनीच दुहेरी आकडा गाठला. कॅप्टन इशा ओझा हीने 36 बॉलमध्ये 38 धावांची खेळी केली. तर खुशी शर्माने 10 धावा केल्या. तर कविशा इगोडागेने 40 रन्सचं योगदान दिलं. तर इतर 5 जणींना काही खास करता आलं नाही. यूएईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. यूएईचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा आहे. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रेणुका सिंह ठाकुर, तनुजा कनवर, पूजा वस्त्राकर आणि राधा यादव चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाने रिचा घोष आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने 200 पार मजल मारली. यामध्ये ओपनर शफाली वर्मा हीनेही योगदान दिलं. हरमनप्रीतने 64 आणि रिचाने 66 धावांची खेळी केली. तर शफालीने 37 धावा केल्या. तर यूएईकडून कविशा इगोडागे हीने दोघींना बाद केलं. तर समायरा धरणीधारका आणि हीना होतचंदानी या दोघींना 1-1 विकेट मिळाली.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंग आणि तनुजा कंवर.
वूमन्स यूएई प्लेइंग ईलेव्हन: ईशा रोहित ओझा (कॅप्टन), तीर्थ सतीश (विकेटकीपर), रिनीता राजित, समायरा धरणीधारका, कविशा इगोडागे, खुशी शर्मा, हीना होतचंदानी, वैष्णवे महेश, रितीका राजित, लावण्य केणी आणि इंधुजा नंदकुमार.
