Women’s Asia Cup 2026 final: जेतेपदासाठी भारत श्रीलंकेशी भिडणार; पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि कुठे पाहावा थेट सामना

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका भिडणार आहे. मागच्या पर्वात श्रीलंकेने भारताला पराभूत केलं होतं. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

Women’s Asia Cup 2026 final: जेतेपदासाठी भारत श्रीलंकेशी भिडणार; पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि कुठे पाहावा थेट सामना
Women’s Asia Cup 2026 final: जेतेपदासाठी भारत श्रीलंकेशी भिडणार; पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि कुठे पाहावा थेट सामना
Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Sep 12, 2026 | 9:36 PM

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेतील हाय-वोल्टेज अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघ आपले रेकॉर्डब्रेक आठवे विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानात उतरेल, तर गतविजेता श्रीलंका संघ आपले विजेतेपद टिकवण्यासाठी सज्ज आहे. गेल्या आशिया कप फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी भारताकडे असेल. भारतीय संघाने ग्रुप ‘ए’ मध्ये 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावत फायनल गाठली आहे. उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करत दिमाखात फायनलमध्ये एन्ट्री केली. श्रीलंकेचा संघही या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. त्यांनी उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध 4 गडी राखून थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकूण 31 टी20 सामन्यांपैकी भारताने 25 सामन्यांत विजय मिळवत आपले वर्चस्व राखले आहे. श्रीलंकेने पाच सामने जिंकले असून, 1 सामना अनिर्णित राहिला. मात्र, गेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता, हा इतिहास विसरून चालणार नाही. मागच्या वेळी 2024 मध्ये डंबुला येथे झालेल्या महिला आशिया कप अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता. टॉस जिंकून आधी फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 20 षटकांत 6 बाद 165 धावा केल्या होत्या. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, मात्र त्यानंतर त्यांची कर्णधार चामरी अटापट्टू 61 धावा आणि हर्षिता समरविक्रमा यांनी भारतीय गोलंदाजांवर प्रतिआक्रमण केले. अटापट्टू बाद झाल्यानंतरही हर्षिताने नाबाद 69 धावांची मॅच-विनिंग खेळी खेळली.

भारत श्रीलंकेची जमेची बाजू

शफाली वर्माने भारताची सर्वात यशस्वी फलंदाज असून तिने 42 च्या सरासरीने आणि 169.69 च्या स्ट्राईक रेटने 168 धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीत तिने 40 चेंडूत 64 धावांची मॅच-विनिंग खेळी केली होती. स्मृती मंधानाने स्पर्धेत 38.50 च्या सरासरीने 154 धावा केल्या आहेत. दीप्ती शर्मा: गोलंदाजीत दीप्ती भारताचे मुख्य अस्त्र असून तिने 3.52 च्या इकॉनॉमीने 11 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेची कर्णधार चामरीने गोलंदाजीत कमाल करत दीप्ती शर्मासोबत संयुक्तपणे स्पर्धेत सर्वाधिक 11 बळी घेतले आहेत. इंडोनेशियाविरुद्ध तिने 7 धावांत 5 बळी घेत हॅटट्रिकसह ऐतिहासिक कामगिरी केली होती. हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षिका सिल्वा यांनी फलंदाजीत अनुक्रमे 89 आणि 86 धावा करत श्रीलंकेच्या डावाला मजबूत पकड दिली आहे.

सामना कुठे आणि कसा पाहायचा?

भारतात हा सामना Sony Sports Ten 1 या टी-वी चॅनेलवर पाहता येईल. तसेच Sony Sports Ten 3 आणि Sony Sports Ten 4 वर प्रादेशिक भाषांमध्ये कॉमेंट्री उपलब्ध असेल. डिजिटलवर हा सामना तुम्ही SonyLiv या ॲप आणि वेबसाईटवर पाहू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us